Sanju Samson : ‘संजूला धोनी व्हायची गरज नाही, तो स्वतःमध्ये खास…!’ गंभीरने थरूर यांना कसं रोखलं? सॅमसनबद्दलचा जुना किस्सा व्हायरल
Sanju Samson : संजू केवळ १४ वर्षांचा असल्यापासून थरूर त्याला ओळखतात.

Shashi Tharoor recalls how Gautam Gambhir corrected about Sanju Samson : काँग्रेस खासदार शशी थरूर हे संजू सॅमसनचे सुरुवातीपासूनचे कट्टर समर्थक राहिले आहेत. संजू केवळ १४ वर्षांचा असल्यापासून थरूर त्याला ओळखतात. नुकत्याच पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत थरूर यांनी सांगितले की, “जेव्हा मी संजूला पहिल्यांदा पाहिले, तेव्हा तो एक सड-पातळ मुलगा होता, पण त्याच्यात जबरदस्त प्रतिभा होती. मी त्याला एकदा म्हटले होते की, तू ‘पुढचा धोनी’ होशील.”
गौतम गंभीरचे ते उत्तर ठरले खरे!
शशी थरूर यांच्या या विधानावर गौतम गंभीरने त्यांना तात्काळ दुरुस्त केले होते. गंभीर म्हणाला होता, “नाही, नाही… त्याला ‘पुढचा धोनी’ होण्याची अजिबात गरज नाही. तो स्वतःमध्ये एक खास खेळाडू आहे, तो फक्त संजू सॅमसन आहे!” गंभीरने दाखवलेला हा विश्वास आज सार्थ ठरला असून संजू सॅमसनने टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये आपल्या बॅटने इतिहास रचला आहे.
विश्वचषकाचा महानायक: संजू सॅमसन –
VIDEO | PTI EXCLUSIVE: Congress MP from Thiruvananthapuram Shashi Tharoor (@ShashiTharoor), speaking about Indian cricketer Sanju Samson, says, “I feel tremendous pride. I first met him when he was 14, a young club cricketer with a big smile and immense talent, already excelling… pic.twitter.com/LSPZgQRelG
— Press Trust of India (@PTI_News) March 19, 2026
नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषकात संजू ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ ठरला. त्याने व्हर्च्युअल क्वार्टर फायनलमध्ये नाबाद ९७, सेमीफायनलमध्ये ८९ आणि फायनलमध्ये ८९ धावांची जबरदस्त खेळी करत भारताला विश्वविजेते बनवण्यात मोलाचा वाटा उचलला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या ९७ धावांच्या खेळीचा उल्लेख करताना थरूर म्हणाले, “त्या दिवशी संजूच्या डोळ्यांत एक वेगळाच आत्मविश्वास होता. टीव्हीवर पाहतानाच मला कळाले होते की हा मुलगा आज आऊट होणार नाही.”
जेव्हा शिक्षणासाठी थरूर यांनी केली मदत –
थरूर यांनी आपल्या लेखात एका रंजक गोष्टीचा खुलासा केला आहे. संजू जेव्हा हायस्कूलमध्ये होता, तेव्हा क्रिकेटमुळे त्याची उपस्थिती कमी होती आणि त्याला परीक्षेस बसण्यापासून रोखले जाण्याची भीती होती. अशा वेळी शशी थरूर यांनी हस्तक्षेप केला. “हा कोण्या जवळच्या व्यक्तीला फायदा मिळवून देण्याचा प्रकार नव्हता, तर एका प्रतिभेला ओळख देण्याचा प्रयत्न होता. नियमात सवलत मिळाल्यानंतर संजूने ती परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली,” असे थरूर यांनी सांगितले.





