IND vs BAN 1st Test Weather Updates : भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जाणाऱ्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला उद्या गुरुवार, 19 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. या कसोटीच्या माध्यमातून चाहत्यांना टीम इंडिया एका महिन्याहून अधिक कालावधीच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा मैदानात उतरताना दिसेल. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर होणाऱ्या सामन्यात पाऊस पडला तर संपूर्ण खेळच उद्ध्वस्त होईल. चला तर मग जाणून घेऊया, भारत-बांगलादेश कसोटीच्या दरम्यान पाच दिवस हवामानाची स्थिती कशी राहील.
कसोटीच्या पाच दिवस चेन्नईतील हवामान कसे असेल?
भारत आणि बांगलादेश यांच्यात चेन्नई येथे होणारा कसोटी सामना 19 ते 23 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. हे जाणून तुमची निराशा होऊ शकते, की पहिल्याच दिवशी पाऊस पडण्याची शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया, कसोटीच्या पाच दिवस चेन्नईचे हवामान कसे असेल.
पहिल्या दिवसाचे हवामान : हवामानाचा अंदाज सांगणाऱ्या अॅक्युवेदर (Accuweather) वेबसाइट्सनुसार, गुरुवार, 19 सप्टेंबर रोजी पावसाची 46 टक्के शक्यता आहे.
दुसऱ्या दिवसाचे हवामान : दुसऱ्या दिवशीही पावसाची शक्यता आहे. मात्र, दुसऱ्या दिवशी पावसाची शक्यता 46 वरून 41 टक्के कमी होऊ शकते.
तिसऱ्या दिवसाचे हवामान : कसोटीच्या तिसऱ्या दिवशीही पाऊस पडू शकतो, पण तिसऱ्या दिवशी पावसाची शक्यता फारच कमी म्हणजे फक्त 25 टक्के आहे.
चौथ्या दिवसाचे हवामान : चौथ्या दिवशी पावसाची शक्यता फारच कमी आहे. चौथ्या दिवशी पावस पडेल याची शक्यता केवळ 13 टक्के इतकी आहे.
पाचव्या दिवसाचे हवामान : सामन्याच्या शेवटच्या दिवशीही पावसाची शक्यता आहे. पाचव्या आणि शेवटच्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता ही 21 टक्के इतकी आहे.
IND vs BAN : एकाच कसोटी मालिकेत ‘हे’ पाच विक्रम मोडू शकतो आर. अश्विन, येथे पहा संपूर्ण यादी….
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार ), यशस्वी जयसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांगलादेश संघ : नजमुल हुसैन शांतो (कर्णधार), महमुदुल हसन जॉय, जाकिर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास, मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, नईम हसन, नाहिद राणा, हसन महमूद, तस्कीन अहमद, सैयद खालिद अहमद, जेकर अली अनिक