IND vs AUS : लकी चार्म भी नहीं आया काम! विजयाची मालिका खंडित झाल्याने सूर्याने विराटच्या विक्रमाशी केली बरोबरी

IND vs AUS Surya equal Virat winning Record : भारताला पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात मेलबर्न येथे ऑस्ट्रेलियाकडून चार विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. मालिकेतील पहिला सामना उत्कृष्ट फलंदाजी करूनही पावसामुळे पूर्ण झाला नव्हता. मात्र, या सामन्यात भारतीय संघाचा ‘लकी चार्म’ संघात असूनही भारताला पराभव पत्करावा लागला. ज्यामुळे कर्णधार सूर्यकुमार यादवची सलग विजयाची मालिका खंडित झाली आहे. त्यामुळे तो विराट कोहलीच्या बरोबरीवर येऊन थांबला आहे.
सूर्याची नेतृत्त्वाखालील भारताची सलग विजयाची मालिका –
कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सलग ९ सामन्यांत विजयी झाला होता. मात्र, ऑस्ट्रेलियाने त्याच्या विजयरथाला ब्रेक लावला. २०१९-२०२० मध्ये विराट कोहलीच्या कर्णधारपदाखालीही भारताने सलग ९ सामन्यांत विजय मिळवला होता. टी-२० मध्ये सर्वाधिक सलग विजयांचा विक्रम रोहित शर्माच्या नावे आहे. रोहितने २०१९ ते २०२२ दरम्यान १४, तर २०२४ मध्ये ११ सलग सामन्यांत विजय मिळवला. सूर्यकुमारने २०२३-२०२४ मध्ये ८ सलग विजय नोंदवले होते.
शिवम दुबेची पण ‘लकी चार्म’ची विजयाची मालिका खंडित –
२०१९ पासून आतापर्यंत शिवम दुबे भारतीय संघाचा ‘लकी चार्म’ होता. कारण तो २०१९ पासून जेव्हा-जेव्हा भारतीय संघात सहभागी होता, त्यावेळी भारताला पराभवाला सामोरे जावे लागले नव्हते. मात्र, आज त्याची पण लकी चार्म’ची विजयाची मालिका खंडित झाली आहे. तो ३७ सामन्यांत संघाच भाग राहिला, ज्यात बहुतांश सामन्यात भारताला विजय मिळवता आला होता, तर काही सामने अनिर्णीत होते. मात्र, या सामन्यात तो प्लेइंग इलेव्हनमध्ये असूनही संघाला पराभव स्वीकारावा लागला.
भारतीय संघ पहिल्या डावातच मागे पडला –
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघचा १८.४ षटकांत सर्वबाद १२५ धावांवर टोपला. पूर्ण २० षटकेही खेळता आली नाहीत. अभिषेक शर्मा (३७ चेंडूंत ६८ धावा) आणि हर्षित राणा (३३ चेंडूंत ३५ धावा) यांनीच योगदान दिले. उर्वरित फलंदाज अपयशी ठरले. ऑस्ट्रेलियाने १३.२ षटकांत ६ गडी गमावून १२६ धावा करत विजय मिळवला. मालिकेतील पुढील सामना २ नोव्हेंबरला होईल.





