IND vs AUS 4th Test | मेलबर्नच्या चाहत्यांना ‘विराट कोहली’कडून धमाकेदार खेळीची अपेक्षा…

IND vs AUS 4th Test (Melbourne) | सधारण दोन् वर्षांपुर्वी विराट कोहलीने टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध ५३ चेंडूत नाबाद ८२ धावांची खेळी करताना भारताला अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवून दिला होता. त्यावेळी मेलबर्न क्रिकेट मैदानावार जमलेल्या तब्बल ९० हजारांपेक्षा अधिक उपस्थित असलेल्या प्रेक्षकांच्या तोंडावर एकच नाव होते, ते म्हणजे विराट कोहली.
क्रिकेटच्या दिग्गजांपैकी एक असलेल्या कोहलीने आपल्या खेळीने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले होते. दोन वर्षांच्या कालावधीनंतर मात्र स्वरूप वेगळे असले तरी साधारण परिस्थिती सारखीच असल्याचे दिसून येत आहे. भारताची रनमशीन असलेल्या विराटला पर्थ येथील कसोटीमध्ये शतक झळकावल्यानंतर विशेष कामगिरी करता आलेली नाही. त्याने पाच डावांमध्ये केवळ २६ धावा केल्या आहेत. मात्र चाहत्यांना खात्री आहे की, एमसीजीच्या मैदानावर भारताची रनमशीन पुन्हा एकदा लयीमध्ये येवून ऑस्ट्रेलियाचा वेगवान मारा उध्वस्त करेल.
मेलबर्नमध्ये विराट कोहलीची लोकप्रियता एवढी आहे की, टूर गाईडपासून सुरक्षा कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येकाला विराट कोहलीने मेलबर्न येथे केलेल्या खेळीची आठवण आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानावर असलेल्या ऑस्ट्रेलियन स्पोर्ट्स म्युझियमच्या तिकिट खिडकीवर पोहचताच तेथे असलेल्या विराटच्या विविध खेळींच्या पोस्टर्सचा दिसून येतात. सन २०१८-१९ मध्ये भारताने सिडनी येथील मैदानावर प्रथमच बॉर्डर गावस्कर मालिका जिंकल्यावर विराट कोहलीने करंडक उचलून त्याचे चुंबन घेतानाचा फोटो लावण्यात आला आहे. त्याबरोबरीने एमसीजीवर तिसरी कसोटी जिंकल्यानंतर भारतीय संघ विराट कोहली व भारतीय् संघ विजयाचा आनंद साजरा करतानाची छायाचित्रे लावण्यात आली आहेत्. या छायाचित्रांच्या सोबतीने कोहलीज कॉन्करर्स (कोहलीचा विजयी संघ) असे देखील लिहिण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर बॉर्डर गावस्कर मालिका जिंकण्याचे स्वप्न २०१८-१९ मध्ये पुर्ण झाले होते.
या म्युझियम एक तासांच्या कालावधीत येथील माहिती सांगणारा गाईड देखील बॉर्डर गावसकर मालिका आणि बॉक्सिंग डे कसोटीचा वारंवार उल्लेख करतो. सामना म्हटले की, त्याच्याकडून विराट कोहलीच्या जुन्या खेळींचा वारंवार उल्लेख करण्यात येतो. कोहली जरी येथील सर्वाचा आवडता खेळाडू असला तरी देखील् सध्या मात्र, भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची जास्त चर्चा सुरू असल्याचे देखील दिसून आले आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये खेळविली जाणारी ही सर्वात मोठी मालिका आहे. त्यामध्ये बॉक्सिंग डे कसोटी ही तर सर्वात महत्वाची आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया सध्या मालिकेत १-१ अशा बरोबरीत असताना येथील् कसोटी नक्कीच रोमांचक होणार आहे, हे दोन्ही संघ एकमेकांसमोर विजयासाठी खेळतील, त्या क्षनाची मी आतुरतेने वाट पहात असल्याचे म्युझियम माहिती सांगणारा गाईड डेव्हिड म्हणाला.





