IND vs AUS : मेलबर्न कसोटीत 88 वर्ष जुना विक्रम निघाला मोडित, क्रिकेटच्या इतिहासात असं कधीच घडलं नाही…

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्याने स्टेडियममधील प्रेक्षकांच्या उपस्थितीच्या बाबतीत एक नवीन विक्रम केला आहे. एमसीजीवर बॉक्सिंग डे कसोटीच्या पाच दिवसांमध्ये एकूण ३,७३,६९१ प्रेक्षकांनी सामना पाहिला, जो एक विश्वविक्रम आहे. १९३७ मध्ये मेलबर्नच्या याच मैदानावर ३,५०,५३४ प्रेक्षकांनी कसोटी सामना पाहिला होता.
Thank you, Melbourne.
An Australian cricketing record, an MCG record and history made ❤️ #AUSvIND pic.twitter.com/VVvfwKWd6J
— Cricket Australia (@CricketAus) December 30, 2024
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले की, सोमवारी सामन्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ७४,३६२ प्रेक्षक उपस्थित होते. या सामन्याने जानेवारी १९३७ मध्ये सर डॉन ब्रॅडमन यांच्या संघाने इंग्लंडचा सामना करताना झालेल्या सामन्याचा विक्रम मोडला.
या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ८७,२४२ प्रेक्षक आले, दुसऱ्या दिवशी ८५,१७४० तिसऱ्या दिवशी ८३,०७३ चौथ्या दिवशी ४३,८६७ आणि पाचव्या दिवशी ७४,३६२ प्रेक्षक उपस्थित होते. दरम्यान, २०२२ च्या टी-२० विश्व करंडकादरम्यान मेलबर्नमध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्याला एकूण ९०,२९३ प्रेक्षक उपस्थित होते.
दरम्यान, मेलबर्न येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉक्सिंग डे कसोटी खेळली गेली. उभय संघांमधील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील ही चौथी कसोटी होती. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत पहिल्या डावात 474 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव 369 धावांवर संपला.
त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव पाचव्या दिवशी 234 धावांवर आटोपला. आघाडीसह ऑस्ट्रेलियाची एकूण आघाडी 339 धावांची झाली आणि भारताला 340 धावांचे लक्ष्य मिळाले, पण प्रत्युत्तरात टीम इंडिया 155 धावांवर ऑलआऊट झाली. टीम इंडियाला हा सामना ना जिंकता आला ना तो अनिर्णित करता आला आणि बॉक्सिंग डे कसोटी कांगारूंनी 184 धावांनी जिंकली.





