IND vs AUS 4th Test : “रोहित शर्मा कर्णधार नसता तर…”, मेलबर्नमधील पराभवानंतर इरफान पठाण स्पष्टच बोलला…

Irfan pathan on Rohit sharma : भारतीय कर्णधार रोहित शर्मा बॉर्डर-गावस्कर मालिकेत खराब फॉर्मशी झुंजत आहे. त्याच्या फॉर्मवर सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, भारताचा माजी खेळाडू इरफान पठाणने रोहित शर्माच्या फॉर्मबाबत मोठे वक्तव्य केले आहे. तो म्हणाला की, “जर तो कर्णधार नसता तर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नसते.”
इरफान पठाण स्पष्टच बोलला…
रोहित शर्माच्या फॉर्मबद्दल बोलताना इरफान पठाण म्हणाला,”रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार हून अधिक धावा केल्या आहेत. यानंतर तो संघर्ष करत आहे. त्याचा फॉर्म त्याला साथ देत नसल्याचे दिसते. तो कर्णधार आहे, म्हणून संघात आहे. तो कर्णधार नसता तर कदाचित संघातही नसता. मग तुमच्या टॉप ऑर्डरमध्ये केएल राहुल, यशस्वी आणि शुभमन गिल असते.”
त्याची अशी फलंदाजी पाहणे निराशाजनक…
रोहित शर्माच्या फॉर्मबाबत तो पुढे म्हणाला, “त्याचा फॉर्म खूपच खराब आहे. भारतातही त्याला धावा करता आल्या नाहीत. त्याची अशी फलंदाजी पाहणे निराशाजनक आहे. ”
दरम्यान, रोहितने बांगलादेशविरुद्ध चार डावांत 42 धावा केल्या तर न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांत केवळ 91 धावा केल्या. या दोन्ही मालिका घरच्या मैदानावर खेळल्या गेल्या. त्याचवेळी ऑस्ट्रेलियातील त्याची कामगिरी खराब झाली आहे. सध्याच्या मालिकेत त्याने 5 डावात केवळ 3, 6, 10, 3 आणि 9 अशा एकूण 31 धावा केल्या आहेत.





