IND vs AUS 3rd Test | भारतीय संघाचा ॲडलेडमध्येच सराव सुरु तर ऑस्ट्रेलिया ब्रिस्बेनसाठी रवाना…

ॲडलेड – गुलाबी चेंडूच्या कसोटीमध्ये भारतीय संघाला 10 गडी राखून पराभवाचा सामाना करावा लागला होता. या पराभवानंतर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आल्यानंतर भारतीय संघाने बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेत पुनरागमन करण्याच्या दृष्टिकोनातून जोरदार सराव केला. मंगळवारी संघाने लाल काकाबुरा चेंडूने सरावावर लक्ष्य केंद्रित केले. शनिवारपासून ब्रिस्बेनला तिसऱ्या कसोटीला सुरुवात होणार असली तरी देखील भारताने ॲडलेड येथेच सरावाला पसंती दिली. ऑस्ट्रेलियाचा संघ ब्रिस्बेनसाठी रवाना झाला आहे.
It is time to look ahead.
Preparations for the Brisbane Test starts right here in Adelaide.#TeamIndia #AUSvIND pic.twitter.com/VfWphBK6pe
— BCCI (@BCCI) December 10, 2024
बीसीसीआयने भारतीय संघाच्या सरावाचा व्हिडियो पोस्ट केला आहे. संघाने त्यांच्या रेड-बॉल कौशल्यांचा सन्मान करण्यावर लक्ष केंद्रित केले, विशेषतः त्यांचे बचावात्मक तंत्र आणि चेंडू टाकण्याचा निर्णय. असे त्या व्हिडियोमध्ये पोस्ट करण्यात आले आहे. याचबरोबरीने “आता पुढे पाहण्याची वेळ आली आहे. ब्रिस्बेन कसोटीची तयारी ॲडलेडमध्येच सुरू होईल,” बीसीसीआयने सराव सत्राचा व्हिडिओ शेअर करताना ट्विटरवर पोस्ट केले.
रोहित शर्मा, ज्याने मागील 12 डावांमध्ये केवळ एका अर्धशतकासह (52) केवळ 142 धावा केल्या आहेत, तो सध्या खराब फॉर्मशी झुंजत आहे. त्याने भारतीय फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाजांचा सामना करताना शक्य तितक्या लवकर आपली लय परत मिळवण्याचे ध्येय ठेवले. सहाव्या क्रमांकावर उतरलेल्या रोहितने ॲडलेडमध्ये तीन आणि सहा धावा केल्या. पर्थमध्ये शतकासह 16 महिन्याच्या शतकाचा दुष्काळ संपवणारा कोहली देखील दोन्ही वेळेस बॅटची कड लागूनच बाद झाला. पहिल्या डावात दुसऱ्या स्लिपकडे आणि नंतर गुलाबी-बॉल कसोटीत विकेटकीपरच्या हाती चेंडू सोपवून कोहली परतला. या दोन्ही फलंदाजानी देखील लाल चेंडूने चांगला सराव केला. सरावादरम्यान कोहली ऑफ स्टम्पबाहेर जाणाऱ्या चेंडूंकडे जास्त काळजीपूर्वक खेळत असल्याचे दिसून आले.
Test Cricket | भारत-द.आफ्रिका यांच्यात होऊ शकते WTC फायनल 2025, जाणून घ्या संपूर्ण समीकरण…
यशस्वीची फटकेबाजी तर राहुलचा बचाव….
बीसीसीआयने पोस्ट केलेल्या व्हिडियोमध्ये पहिल्या दोन लढतीत सलामीवीरांची भूमिका बजावलेले यशस्वी जैस्वाल व लोकेश राहुल हे देखील सराव करताना दाखविले आहेत. यशस्वी जैस्वाल धमाकेदार स्ट्रेट शॉर्ट्स खेळताना या व्हिडियोमध्ये दिसला आहे. यशस्वीने पहिल्या कसोटीत दमदार दीडशतकी खेळी केली होती. दुसऱ्या कसोटीत मात्र तो धावांसाठी झगडत असलेला दिसून आला. दुसरा सलामीवीर राहुलने फलंदाजी चांगली केली तरी त्याला मोठी खेळी करण्यात अपयश येत आहे. सरावामध्ये राहुल अधिक संयोजित दिसला. त्याने बचावावर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. आक्रमक फलंदाज ऋषभ पंतने देखील काही कडक फटके मारत असल्याचे व्हिडियोमध्ये दिसत आहे.





