IND vs AUS 3rd Test : मालिका भारताच्या बाजूने झुकलेली नाही – कर्णधार कमिन्स

IND vs AUS 3rd Test :- तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये बहुतांश वेळेस वरचढ ठरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाची दुसऱ्या डावात भारतीय वेगवान गोलंदाजांच्या समोर भांबेरी उडाली होती. बुधवारी ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावाला सुरुवात केल्यानंतर त्यांचा डाव 7 बाद 89 धावांवर घोषीत करावा लागला. त्यामुळे भारताला विजयासाठी 275 धावांचे लक्ष्य मिळाले. भारताने बिनबाद 8 अशी सुरुवात देखील केली होती. मात्र, पावासाला सुरूवात झाल्याने कसोटी अनिर्णित राखण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर पाच सामन्यांची मालिका भारताच्या बाजूने झुकली आहे, यावर विश्वास बसत नसल्याचे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार असलेल्या पॅट कमिन्सनं लढतीनंतर बोलताना सांगितले.
तिसऱ्या लढतीमध्ये पहिल्या डावात लॆबुशेन व हेड यांनी दमदार भागीदारी करताना ऑस्ट्रेलियाला 450 धावांचा टप्पा गाठून दिला होता. त्यानंतर भारताचे फलंदाज पहिल्या डावात झटपट बाद झाल्याने भारतासमोर फॊलोअॉन टाळण्याचे आव्हान होते. अशा वेळी बुमराह व आकाशदीप यांनी 39 धावांची भागीदारी करताना फॊलोअॉन टाळण्यात यश मिळवले होते.
कमिन्स बोलताना म्हणाला, आम्ही कधीही लयीबाबत चिंतीत होतो, असे म्हणू शकत नाही. आम्ही कधीच त्याची पर्वा करत नाही. या आठवड्यात आम्ही चांगली कामगिरी करताना बरेच काही साध्य केले आहे, असे तो म्हणाला. आमच्या फलंदाजांनी दोन उत्कृष्ट भागीदारी केल्या. जेव्हा आम्हाला नवीन खेळपट्टीवर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले, तेव्हा आम्ही सुमारे 445 धावा केल्या. खेळपट्टी फलंदाजांना कमी साथ देत असताना भारताला 260 धावांवर थांबविण्यात यशस्वी झालो. आमची कामगिरी नक्कीच चांगली आहे, असे तो पुढे बोलताना म्हणाला.
आता मालिका 1-1 अशी बरोबरीत असताना, भारताचा स्टार ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनने निवृत्तीची घोषणा करून कमिन्ससह सर्वांना आश्चर्यचकित केले. ऑस्ट्रेलियन कर्णधार म्हणाला, “हे नक्कीच थोडे धक्कादायक होते. तो निश्चितच महान खेळाडू आहे. फार कमी ऑफस्पिनर्स आहेत, ज्यांनी इतके दिवस आपली छाप सोडण्यात यश मिळवले आहे. त्याची सर्वकाळातील महान खेळाडूंमध्ये गणना केली जाईल.
अश्विन एक उत्कृष्ट प्रतिस्पर्धी
कमिन्स म्हणाला, अश्विन नेहमीच एक उत्कृष्ट प्रतिस्पर्धी होता. आमच्यात आणि त्याच्यात नेहमीच खूप रंजक स्पर्धा झाली आहे. त्याने आमच्याविरुद्ध नेहमीच दर्जेदार कामगिरी केली आहे, म्हणूनच आमचा संघ त्याचा खूप आदर करतो, असे कमिन्स बोलताना म्हणाला. यापुर्वी अश्विनने ऑस्ट्रेलिया दौर्यात चमकदार कामगिरी केली होती. त्याने गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना नेहमीच कात्रीत पकडून त्यांना तंबूचा रस्ता दाखविला होता.
IND vs AUS 3rd Test : पावसाने केला खेळ खराब, 12 वर्षांनंतर गाब्बामध्ये पहिल्यादांच कसोटी अनिर्णित….
पावसाने निराशा…
पावसामुळे अनिर्णित राहिलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याचे वर्णन कमिन्सने निराशाजनक केले. कारण पावसामुळे खेळाडूंना सतत्याने तंबूत परतावे लागत होते. तो म्हणाला, आम्हाला अनेक वेळा आत-बाहेर जावे लागले. भूतकाळात असे कधी घडल्याचे मला आठवत नाही. ते निराशाजनक असल्याचे तो म्हणाला. याबरोबरीने त्याने स्नायूंच्या दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड मालिकेत खेळू शकनार नसल्याचे त्याने स्पष्ट केले. मात्र हेड तंदुरुस्त असेल, अशी आशा देखील् त्याने व्यक्त केली.





