कॅनबेरा – भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा संघात परतल्याने सलामीच्या जोडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. पहिल्या कसोटीमध्ये लोकेश राहुल व यशस्वी जैस्वाल यांनी सलामी दिली होती. दुसऱ्या डावात दोघांनी २०१ धावांची सलामी दिली होती. दोघांच्या भागीदारीच्या जोरावर भारताने पहिली लढत २९५ धावांनी जिंकली होती. त्यामुळे राहुल व यशस्वी यांनीच डावाची सुरुवात करावी व रोहित शर्माने तिसऱ्या क्रमांकावर खेळावे, असे मत भारताचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने व्यक्त केले. जैस्वालने दमदार शतकी खेळी केली असली तरी लोकेश राहुलने पहिल्या डावात २६ तर दुसऱ्या डावात ७७ धावांची दमदार खेळी केली होती. राहुलच्या दोन्ही खेळीमुळे भारताला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले होते. त्यामुळे राहुल व यशस्वी यांनी डावाची सुरुवात करावी, रोहितने तिसऱ्या क्रमांकावर तर शुभमन गिलने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी यावे, असे पुजारा ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना म्हणाला. Retirement : टीम इंडियाच्या घातक गोलंदाजाचा अखेर क्रिकेटला अलविदा , IPL 2025 च्या लिलावात UNSOLD राहणं लागलं जिव्हारी… शुभमनसाठी पाचवा क्रमांक योग्य… सध्याच्या घडीला शुभमन गिलसाठी पाचवा क्रमांक योग्य आहे. सुरुवातीला दोन गडी झटपट बाद झाले तरी तो नवीन चेंडू हाताळू शकतो. मात्र, तो ३० षटकांनंतर फलंदाजीला आला तो नैसर्गिक खेळ करू शकेल. यावेळी त्याच्या साथीला ऋषभ पंत देखील असेल जो चेंडू चांगल्या प्रकारे खेळू शकेल, असे पुजाराने बोलताना सांगितले.