Retirement : टीम इंडियाच्या घातक गोलंदाजाचा अखेर क्रिकेटला अलविदा , IPL 2025 च्या लिलावात UNSOLD राहणं लागलं जिव्हारी…

Siddarth Kaul Retirement : विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांच्यासह 2008 च्या अंडर-19 विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असलेला वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौलने गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. नुकत्याच झालेल्या आयपीएल मेगा लिलावात सिद्धार्थ कौल याला कोणत्याही संघाने खरेदी केले नाही. त्यानंतर वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला असेल पण तरीही त्याने परदेशी लीगमध्ये खेळण्याचा पर्याय खुला ठेवला आहे. मूळचा पंजाबचा असलेल्या 34 वर्षीय वेगवान गोलंदाजाने गुरूवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून निवृत्तीची घोषणा केली.
34-year-old Siddarth Kaul – owner of six international caps, 55 IPL caps and an U-19 World Cup – calls time on his cricket career in India, opening up the possibility of playing overseas
Read more: https://t.co/AiT9R9sCVw pic.twitter.com/i1nrVIW35B
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 28, 2024
टीम इंडियासाठीची कामगिरी…
सिद्धार्थ कौलने 2018 मध्ये सीनियर टीम इंडियासाठी डेब्यू एकदिवसीय सामना खेळला. त्याच वर्षी त्याने आपला पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामनाही खेळला. सिद्धार्थने टीम इंडियासाठी एकूण 3 वनडे सामने खेळले आहेत. त्याला या प्रकारात एकही विकेट मिळाली नाही. तो 2018 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता.
तर शेवटचा टी-20 सामना 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला गेला होता. सिद्धार्थने भारताकडून 3 टी-20 सामन्यात 4 विकेट घेतल्या आहेत. तर सिद्धार्थने देशांतर्गत क्रिकेटमध्ये 88 प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 26.77 च्या सरासरीने 297 बळी घेतले. त्याने 17 वेळा पाच गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे.
सिद्धार्थची आयपीएलमधील कामगिरी….
साल 2016 मध्ये सनरायझर्स हैदराबादने सिद्धार्थचा संघात समावेश केला होता. याआधी त्याने 2013 मध्ये आयपीएल पदार्पण सामना खेळला होता. हैदराबादसोबतच सिद्धार्थ कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला आहे. सिद्धार्थने आयपीएलमध्ये आतापर्यंत 54 सामने खेळले आहेत. या कालावधीत 58 विकेट्स घेतल्या आहेत. एका सामन्यात 29 धावांत 4 बळी घेणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.





