India tour of England 2025 | मैदानात उतरण्याच्या आधीच टीम इंडियानं केला विश्वविक्रम, Birmingham कसोटी सामन्याच्या 7 महिन्यांपूर्वी झालं असं की …

India vs England Test series 2025 (Birmingham) | भारतीय क्रिकेट संघ सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये व्यस्त आहे, जिथे भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिकेतील 2 सामने पार पडले असून मालिका 1-1 ने बरोबरीत आहेत. या मालिकेतील शेवटचा सामना 3 जानेवारीपासून सिडनी येथे खेळवला जाणार आहे. याच दरम्यान भारतीय क्रिकेट संघाने मैदानात न उतरता एक आगळा-वेगळा विश्वविक्रम केला आहे. ही बाब पुढील वर्षी होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेशी संबंधित आहे. दरम्यान, पुढील वर्षी जूनमध्ये टीम इंडिया इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार असून, तिथे दोन्ही संघांमध्ये पाच कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.
ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर सुरू होईल. आता अशी बातमी समोर आली आहे की ती पाहून कोणीही थक्क होईल. खरंतर, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील दुसरा सामना बर्मिंगहॅममध्ये खेळवला जाणार आहे, त्या लढतीची पहिल्या 4 दिवसांची सर्वच्या सर्व तिकिटे विकली गेली आहेत.
भारत विरुद्ध इंग्लंड बर्मिंघम कसोटी सामना 2 जुलै 2025 रोजी सुरू होईल, ज्याला अजून 203 दिवस बाकी आहेत. सुमारे 7 महिन्यांपूर्वीच सामन्याची सर्व तिकिटे विकली जाणं, हे म्हणजे इंग्लंड आणि भारतातील क्रिकेटची क्रेझ एका वेगळ्या पातळीवर असल्याचा पुरावा आहे.
BREAKING: Days 1-4 of the Men’s Test against India are 𝗦𝗢𝗟𝗗 𝗢𝗨𝗧! ❌
First non-Ashes Test to sell out four days in advance.#Edgbaston | #ItsJustDifferent pic.twitter.com/NWD8aPrbJ8
— Edgbaston Stadium (@Edgbaston) December 10, 2024
भारत आणि इंग्लंड यांच्यातील या मालिकेला पतौडी ट्रॉफी असे नाव देण्यात आले असून त्यातील पहिला सामना 20 जूनपासून लीड्स येथे खेळवला जाणार आहे. बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या सामन्याच्या पहिल्या चार दिवसांची सर्व तिकिटे विकली गेली असून आता जर दुसऱ्याला व्यक्तीला या कसोटी लढतीचा आनंद घ्यायचा असेल तर तो फक्त पाचव्या दिवसाच्या खेळाचेच तिकीट खरेदी करू शकतो.
खुद्द एज्बेस्टन स्टेडियमच्या ट्विटर हँडलने या संदर्भात माहिती शेअर केली आहे की, पहिल्या चार दिवसांची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. तसेच येथे कमीत कमी तिकिटांची किंमत 2,700 रुपयांपासून सुरू होते आणि 32 हजार रुपयांपर्यंत जाते.तर 16 वर्षांखालील मुलांसाठी तिकीटाची किंमत 10 पौंड म्हणजेच सुमारे 1,080 रुपये ठेवण्यात आली आहे. अॅशेस वगळता, सामन्याच्या पहिल्या चार दिवसांच्या तिकीटांची आगाऊ विक्री होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आणखी आश्चर्याची बाब म्हणजे तिकिटांची विक्री 7 महिने आधीच झाली आहे.





