Income Tax: वीकेंडलाही आयकर कार्यालये सुरू राहणार; कर भरण्यासाठी विशेष व्यवस्था
Updated On:

नवी दिल्ली – प्राप्तिकर विभागाने देशभरातील सर्व कार्यालयं 29 ते 31 मार्च या कालावधीत खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 ची मुदत 31 मार्चला संपत असून, करदात्यांना शेवटच्या दिवसापूर्वी कर भरता यावा, यासाठी ही सोय करण्यात आली आहे. शनिवार-रविवार आणि सोमवारी धार्मिक सुट्टी असूनही कार्यालयं सुरू राहतील.
प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख जवळ येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. दरवर्षीप्रमाणे, राज्य आणि केंद्र सरकारांचे ताळेबंद पूर्ण करण्यासाठी 31 मार्चला बँका आणि प्राप्तिकर कार्यालयं उघडी ठेवणं गरजेचं असतं. यंदाही ही व्यवस्था लागू करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेनेही सर्व बँकांना 31 मार्च रोजी कामकाज सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून करदात्यांना अडचण होऊ नये.





