Pune News : महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना मिळकतकर भरणा करणे सुलभ व्हावे यासाठी विविध क्षेत्रीय व संपर्क कार्यालयांमध्ये नागरी सुविधा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. आर्थिक वर्ष २०२५-२६ हे ३१ मार्च २०२६ रोजी संपत असल्याने वर्षअखेर नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सोयीस्करपणे मिळकतकर भरता यावा यासाठी महापालिकेअंतर्गत सर्व नागरी सुविधा केंद्रे व संपर्क कार्यालये ३१ मार्च २०२६ पर्यंत साप्ताहिक तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहेत. ही केंद्रे २९ मार्च २०२६ पर्यंत सकाळी ९.४५ ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत सुरू राहतील. तर ३० व ३१ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.४५ ते रात्री ८.०० वाजेपर्यंत सेवा उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे ज्यांनी अद्याप मिळकतकराचा भरणा केलेला नाही, त्यांनी विहित मुदतीत कर भरून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत करण्यात आले आहे. तर भरावा लागेल २४ टक्के दंड महापालिकेचा मिळकतकर ३१ मार्च पूर्वी न भरल्यास प्रशासनाकडून थकबाकीच्या रकमेवर प्रतिवर्ष मिळकतकराच्या एकूण रकमेवर २ टक्के दंड आकारला जातो. अनेक नागरिकांकडून कर भरण्यासाठी मार्चअखेरीचे शेवटचे दोन तीन दिवस निवडले जातात. मात्र, यावेळी अचानक मोठ्या प्रमाणात कर भरणा केला जात असल्याने महापालिकेचे संकेतस्थळ स्लो होणे तसेच इतर तांत्रिक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे, नागरिकांनी आतापासूनच कर भरण्यास प्राधान्य दिल्यास आयत्यावेळी येणाऱ्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही. त्यामुळे, कर भरण्यासाठी शेवटचे दहा दिवस राहिल्याने नागारिकांनी तत्काळ कर भरावा, असे आवाहन पालिकेने केले आहे. Organic Watermelon : शेतकऱ्यांकडून थेट रस्त्यांवर ‘ऑर्गॅनिक कलिंगड’ विक्री; इराण-अमेरिका-इस्राईल युद्धाचा शेतमाल निर्यातीला फटका