Thalapathy Vijay: तमिळनाडूमध्ये ऐतिहासिक विजय मिळवणारे TVK प्रमुख थलापती यांचा पाय आता खोलात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकीकडे तामिळनाडूमध्ये सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू असतानाच दुसरीकडे विजय यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. कथित आयकर अनियमिततेप्रकरणी FIR दाखल करण्याची मागणी करत मद्रास हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे शपथविधीपूर्वीच विजय यांच्या राजकीय वाटचालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या याचिकेला हायकोर्टाच्या रजिस्ट्रारकडून क्रमांक देण्यात आला असून लवकरच या प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. ‘पुली’ चित्रपटाशी संबंधित वाद (Thalapathy Vijay) 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या Puli या चित्रपटाशी ही याचिका संबंधित आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर आयकर विभागाने विजय यांच्याशी संबंधित ठिकाणी छापे टाकले होते. या कारवाईदरम्यान काही आर्थिक अनियमिततेचे संकेत मिळाल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. हेही वाचा : Tamilnadu Politics: तमिळनाडूत सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग! विजय यांच्या ‘TVK’ने मागितला काँग्रेसचा पाठिंबा याचिका सुरुवातीला स्वीकारण्यात आली नव्हती. मात्र मुख्य न्यायाधीश सुशांत अरविंद धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती जी अरून मुरुगन यांच्या खंडपीठाने रजिस्ट्रारला ती नोंदवण्याचे निर्देश दिल्यानंतर आता या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. याचिकेनुसार, चित्रपट निर्मात्यांनी विजय यांना सुमारे 16 कोटी रुपये चेकद्वारे आणि जवळपास 4.93 कोटी रुपये रोख दिल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र कर केवळ चेकद्वारे दिलेल्या रकमेवरच भरल्याचा आरोप आहे. तसेच चौकशीदरम्यान विजय यांनी काही रोख रक्कम स्वीकारल्याचं मान्य केल्याचंही याचिकेत नमूद करण्यात आलं आहे. अतिरिक्त उत्पन्न जाहीर (Thalapathy Vijay) विजय यांनी 2015-16 या आर्थिक वर्षासाठी सुमारे 15 कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न जाहीर केल्याची माहितीही समोर आली आहे. त्यानंतर त्यांनी पुढील वर्षासाठी एकूण उत्पन्नासह आयकर विवरणपत्र सादर केलं होतं. ( Thalapathy Vijay) सध्या या सर्व घडामोडींमुळे विजय यांच्या विरोधात फौजदारी कारवाई आणि FIR दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून हायकोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सरकार स्थापनेचा दावा ( Thalapathy Vijay) Thalapathy Vijay: शपथविधीपूर्वीच थलापती विजयचा पाय खोलात ; न्यायालयात ‘त्या’ जुन्या घटनेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी दरम्यान, विजयच्या टीव्हीके (TVK) पक्षाने तामिळनाडूमध्ये सरकार स्थापनेचा दावा केला आहे. विजयच्या टीव्हीके पक्षाला 108 जागा मिळाल्या आहेत. तर बहुमतासाठी 118 आमदारांची गरज आहे. विजयने राज्यपालांकडे 112 आमदारांचा पाठिंबा असलेलं पत्र दिलं आहे. काँग्रेसच्या पाच आमदारांनी विजय थलापतीला पाठिंबा जाहीर केला आहे.