Form 16: प्राप्तिकर भरणाऱ्या नोकरदार वर्गासाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. नवीन आर्थिक वर्षापासून (1 एप्रिल 2026) टॅक्स सिस्टममध्ये मोठा बदल होत आहे. आतापर्यंत ज्या ‘फॉर्म 16’ च्या आधारे तुम्ही तुमचा आयटीआर (ITR) फाईल करत होता, त्याची जागा आता ‘फॉर्म 130’ (Form 130) घेणार आहे. केंद्र सरकारने टॅक्स प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि डिजिटल करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. काय आहे हा नवा ‘फॉर्म 130’? फॉर्म 130 हा मुळात तुमच्या ‘टीडीएस’ (TDS) कपातीचा वार्षिक दाखला असेल. नवीन प्राप्तिकर नियम 2026 नुसार, आता कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना फॉर्म 16 ऐवजी फॉर्म 130 जारी करतील. हा फॉर्म केवळ पगारदारांसाठीच नाही, तर पेन्शनधारक आणि व्याजातून उत्पन्न मिळवणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठीही लागू असेल. बँका ज्येष्ठ नागरिकांसाठी हा फॉर्म जारी करतील. हेही वाचा – शेअर बाजारात हाहाकार! सेन्सेक्स 1636 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी बुडाले फॉर्म 130 चे तीन महत्त्वाचे भाग: या नवीन फॉर्मची रचना अधिक स्पष्ट करण्यात आली असून त्याचे तीन मुख्य भाग असतील. भाग अ (Part A): यामध्ये कंपनी (Employer) किंवा बँक आणि करदात्याची मूलभूत माहिती असेल. भाग ब (Part B): यामध्ये एकूण उत्पन्न, कापलेला टॅक्स (TDS) आणि इतर कर तपशिलांचा सारांश असेल. भाग क (Part C): हा सर्वात महत्त्वाचा भाग असून यात टॅक्सेबल इन्कमचे पूर्ण कॅल्क्युलेशन दिले जाईल. यामध्ये दोन परिशिष्टे (Annexures) असतील: Annexure I: पगारदार कर्मचाऱ्यांसाठी (पगार, सवलती आणि वजावट). Annexure II: ज्येष्ठ नागरिकांसाठी (पेन्शन आणि व्याजाच्या उत्पन्नाचा तपशील). करदात्यांना काय फायदा होईल? पगारातून नेमका किती टॅक्स कापला आणि तो सरकारकडे जमा झाला की नाही, याचा पूर्ण हिशोब एकाच ठिकाणी मिळेल. हा फॉर्म पूर्णपणे ‘सिस्टम जनरेटेड’ असेल, जो ‘ट्रॅसेस’ (TRACES) पोर्टलवरून डाउनलोड केला जाईल. यामुळे मॅन्युअल चुकांची शक्यता कमी होईल. टॅक्स विभाग आणि कंपनी यांच्यातील डेटा मॅच होणे सोपे होईल, ज्यामुळे आयटीआर भरताना तांत्रिक अडचणी येणार नाहीत. हेही वाचा – Kia Seltos चा जलवा! भारत NCAP क्रैश टेस्टमध्ये मिळवले ‘5 स्टार’ रेटिंग; टाटाच्या ‘या’ गाडीलाही टाकले मागे महत्त्वाच्या तारखा आणि नियम – दरवर्षी 15 जून पर्यंत कंपन्यांना हा फॉर्म कर्मचाऱ्यांना देणे बंधनकारक असेल. फॉर्ममध्ये काही चूक असल्यास, कंपनी सुधारित टीडीएस स्टेटमेंट फाईल करून तुम्हाला नवीन फॉर्म देऊ शकते. जर तुम्ही वर्षातून दोन नोकऱ्या बदलल्या असतील, तर दोन्ही कंपन्या तुम्हाला वेगवेगळा फॉर्म 130 (भाग अ आणि ब) जारी करतील. या फॉर्मवर डिजिटल किंवा मॅन्युअल स्वाक्षरी असेल. मूळ प्रत हरवल्यास ‘ड्युप्लिकेट’ फॉर्मही मिळवता येईल. दरम्यान, आयटीआर भरताना तुम्हाला हा फॉर्म सोबत जोडण्याची गरज नाही, परंतु भविष्यातील पडताळणीसाठी तो जपून ठेवणे आवश्यक आहे. नव्या आर्थिक वर्षात टॅक्सचे टेन्शन कमी करण्यासाठी सरकारने उचललेले हे एक आधुनिक पाऊल मानले जात आहे.