Pro Kabaddi 2024 : युवा रेडर मसानामुत्थूची चमकदार कामगिरी, तमिळ थलैवाजचा यूपी योद्धावर सहज विजय…

Pro Kabaddi 2024 (UP Yoddhas vs Tamil Thalaivas) : प्रो कबड्डी लीगच्या 11व्या हंगामातील 77 व्या सामन्यात तमिळ थलैवाजने यूपी योद्धाचा 40-26 असा पराभव केला. या सामन्यात तामिळ थलैयवाजचा मुख्य रेडर नरेंद्र कंडोला दुखापतीचा बळी ठरला, परंतु असे असतानाही नवीन च्या चमकदार कामगिरीमुळे त्यांनी विजय मिळवला.
मसानामुत्थूने रेडिंगमध्ये 6 गुण घेतले तर मोईन शफाघीनेही 8 गुणाची कमाई करताना महत्तपूर्ण योगदान दिले. दुसरीकडे यूपी योद्धाकडून फक्त गगन गौडानेच चांगाली कामगिरी केली आणि एकूण 8 गुण घेतले.
ரொம்ப சந்தோஷம்யா 🥹
இன்றைய ஆட்டத்தின் சிறப்பான சம்பவம் என்ன? 😍💬#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #UPYoddhas #TamilThalaivas pic.twitter.com/6JvbmVE6BL
— ProKabaddi (@ProKabaddi) November 26, 2024
खेळाच्या पहिल्या 10 मिनिटांत सामना जवळपास बरोबरीत होता. एकवेळ तामिळ थलायवाजने 4 गुणांची आघाडी मिळवली होती, पण त्यानंतर यूपी योद्धाने सुपर टॅकलद्वारे सामन्यात पुनरागमन केले. यूपी योद्धाचा बचाव आणि रेडर्स या दोघांनीही चांगली कामगिरी केली होती, परंतु असे असूनही, तमिळ थलैवाज आघाडीवर होते. मात्र, पूर्वार्धाच्या अखेरीस यूपी योद्धाने तमिळ थलायवाजला ऑलआऊट केले आणि स्वतः सामन्यात आघाडी घेतली. पहिल्या सत्रात युपी योद्धाने 17-12 अशी आघाडी घेतली होती.
Pro Kabaddi 2024 : पुणेरी पलटणचा बंगाल वॉरियर्सवर एकतर्फी विजय….
तामिळ थलायवासला मोठा धक्का बसला जेव्हा त्यांचा मुख्य रेडर नरेंद्र कंडोला रेंडिग दरम्यान दुखापतीचा बळी ठरला. याच कारणामुळे त्याला उत्तरार्धात मैदानात उतरवण्यात आले नाही. मात्र, दुसऱ्या सत्रात युवा रेडर मसानामुत्थूने तमिळ थलायवाजसाठी शानदार खेळ केला आणि संपूर्ण यूपी संघाला एकाच वेळी आॅलआऊट केले. यासह तमिळ थलायवास संघ आघाडीवर आला. अवघ्या 5 मिनिटांत तमिळ थैलायवाजने संपूर्ण सामन्याचे चित्र पालटून टाकले. अर्ध्या तासाचा खेळ संपल्यानंतर यूपी योद्धाचा संघ पुन्हा एकदा ऑलआऊटच्या जवळ आला. यूपी योद्धाच्या बचावपटूंना मसानामुत्थूचा सामना करता आला नाही आणि यामुळे यूपी संघ सामन्यात खूप मागे पडला आणि शेवटी त्यांनी सामना गमावला.





