Pro Kabaddi 2024 (Match 130) | गतविजेत्या पुणेरी पलटणचा शेवट गोड, अखेरच्या सामन्यात तमिळ थलैवाजवर केली मात…

Pro Kabaddi 2024 (Puneri Paltan vs Tamil Thalaivas) | प्रो कबड्डी लीगच्या 11व्या हंगामातील 130 व्या सामन्यात पुणेरी पलटण आणि तमिळ थलैवाज आमने-सामने होते. यामध्ये गतविजेत्या पुणेरी पलटणने प्रो कबड्डी लीगच्या 11व्या मोसमाचा विजयासह समारोप केला. त्यांनी त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात तमिळ थलैवाजचा 42-32 असा पराभव केला.
#PuneriPaltan चा विजय म्हणजे चाहत्यांना आनंदाचं उधाण! 🤩🧡#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #TamilThalaivas pic.twitter.com/ltQRnvEON1
— ProKabaddi (@ProKabaddi) December 23, 2024
पुणेरी पलटणसाठी या सामन्यात आर्यवर्धनने चमकदार कामगिरी केली आणि सुपर-10 पूर्ण केले . डिफेंसमध्ये (बचाव) गौरव खत्रीने हाय फाईव्ह पूर्ण केले. दुसरीकडे तमिळ थलैवाजच्या वतीने कर्णधार नितीश कुमारने हाय फाईव्ह आणि सचिन तन्वरने 7 गुण घेतले. हिमांशूनेही 8 गुण घेतले.
पुणेरी पलटणने या PKL मोसमात 22 पैकी 9 सामने जिंकले आणि 10 सामने गमावले. तर संघाचे 3 सामने बरोबरीत राहिले. पुणेरी पलटण 60 गुणासंह गुणतालिकेत आठव्या स्थानी राहिला. दुसरीकडे तमिळ थलैवाजने 22 पैकी 8 सामने जिंकले आहेत तर 13 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. संघाचा एक सामना बरोबरीत संपला. गुणतालिकेत संघ 50 गुणांसह 9व्या स्थानावर राहिला.





