Pro Kabaddi 2024 (Match 117) | हरियाणा स्टीलर्स पराभूत, विजयासह युपी योद्धाजच्या प्ले-ऑफच्या आशा कायम…

Pro Kabaddi 2024 (Haryana Steelers vs UP Yoddhas) : प्रो कबड्डी लीग 2024 च्या 117 व्या सामन्यात, यूपी योद्धांनी टेबल टॉपर हरियाणा स्टीलर्सचा 31-24 असा पराभव करून जबरदस्त विजय नोंदवला. या विजयासह यूपीचे 69 गुण झाले असून ते गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आले आहेत. यासह त्यांचे प्ले-ऑफमधील स्थान जवळपास निश्चित झाले आहे.
योद्धाज़ ने स्टीलर्स पर धमाकेदार जीत के साथ प्लेऑफ़ की उम्मीदों को किया मज़बूत 💪💙 #ProKabaddi #PKL11 #ProKabaddiOnStar #LetsKabaddi #HaryanaSteelers #UPYoddhas pic.twitter.com/toAH1jVIGr
— ProKabaddi (@ProKabaddi) December 17, 2024
हरियाणाचा हा सलग दुसरा पराभव असून 79 गुणांसह ते अजूनही पहिल्या स्थानावर आहेत. प्रो कबड्डी लीगच्या 11व्या हंगामात हरियाणा स्टीलर्स आणि दबंग दिल्ली केसी या दोन संघांनी आधीच प्ले-ऑफमध्ये प्रवेश निश्चित केला आहे.
Pro Kabaddi 2024 (Match 116) | पाटणाविरूध्दच्या पराभवासह गतविजेत्या पुणेरी पलटणला मोठा धक्का….
प्रो कबड्डी लीग 2024 च्या या सामन्यात यूपी योद्धासाठी भवानी राजपूतने रेडिंगमध्ये (चढाई) सर्वाधिक 11 रेड पॉइंट्स घेतले आणि डिफेंसमध्ये सुमित सांगवानने (बचाव) 3 टॅकल पॉइंट घेतले. हरियाणा स्टीलर्ससाठी रेडिंगमध्ये विशाल ताटे-विनयने 6 आणि डिफेंसमध्ये शादुलने बचावात चार टॅकल पॉइंट घेतले.





