Pro Kabaddi 2024 (Patna Pirates vs Puneri Paltan) : प्रो कबड्डी लीग 2024 च्या 116 व्या सामन्यात पाटणा पायरेट्सने पुणेरी पलटणचा 37-32 असा पराभव केला. या विजयासह पाटणा पायरेट्स प्लेऑफमध्ये पोहोचणार हे जवळपास निश्चित झाले आहे. दुसरीकडे या पराभवाने गतविजेत्या संघाला मोठा धक्का बसला असून पुढील फेरी गाठणे त्यांच्यासाठी कठीण झाले आहे.
The Pirates inch closer to the ‘Q’ mark 🤩#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #PatnaPirates #PuneriPaltan pic.twitter.com/WXlnF6ZyRi
— ProKabaddi (@ProKabaddi) December 16, 2024
प्रो कबड्डी लीगच्या 11व्या हंगामात आतापर्यंत हरियाणा स्टीलर्स (78 गुण) आणि दबंग दिल्ली केसी (71 गुण) या दोन संघांनी प्लेऑफमध्ये प्रवेश निश्चित केला आहे.पाटणा पायरेट्सचे या विजयासह 68 गुण झाले असून गुणतालिकेत तिसऱ्या क्रमाकांवर पोहचले आहेत. तर पुणेरी पलटण या पराभवासह 8व्या क्रमाकांवर आले असून त्यांचे 55 गुण झाले आहेत.
पटना पायरेट्ससाठी प्रो कबड्डी लीग 2024 च्या या सामन्यात, देवांकने रेडिंगमध्ये (चढाई) सर्वाधिक 11 गुण घेतले आणि शुभमने डिफेंसमध्ये (बचाव) हाय 5 घेत 5 टॅकल गुण घेतले. पुणेरी पलटणकडून अमन, अबिनेश नादराजन आणि आकाश शिंदे यांनी प्रत्येकी 6 गुण घेतले.