पुणे : कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर इशरत बाग परिसरात भरधाव बसचे ब्रेक निकामी झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. बसने पाच ते सहा वाहनांना धडक दिली. अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून दोघे जण गंभीर जखमी झाले. एनआयबीएम रस्त्यावर इशरत बाग परिसरात रविवारी रात्री साडे आठच्या सुमारास बसचे ब्रेक निकामी झाले.
बसने पाच ते सहा वाहनांना धडक दिली. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे रात्री उशीरापर्यंत समजू शकली नाही