Pune News : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल पंपापर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणारे सततचे हल्ले चिंतेचा विषय आहेत. यामुळे या घटनांच्या निषेधार्थ पेट्रोल डीलर्स असोसिएशनने एक मोठा निर्णय घेतला आहे. संध्याकाळी सातनंतर पुण्यातील पेट्रोल पंप बंद राहणार आहेत. यामुळे पुणेकरांचे मोठे हाल होणार आहेत. यासंदर्भात पेट्रोल डीलर्स असोसिएशनने पुणे पोलिस प्रशासनाला पत्र पाठवले होते. या पत्रात कठोर कारवाई केली नाही आणि ठोस पाऊले उचलली गेली नाही तर पेट्रोप पंपाची सेवा वेळेत बदत करू असा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पाठवलेल्या पत्रात पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांवर वाढत्या हल्ल्यांमुळे त्यांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था सुधारण्याबाबत ठोस पावले उचलावीत नाही तर सेवा वेळेत बदल करण्यावाचून पर्याय राहणार नाही, असे म्हटले होते. याप्रकरणी पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ता अली दारूवाला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यामध्ये पेट्रोल पंप चालक आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचे प्रकार वाढले आहेत. यासंदर्भात अमितेश कुमार यांना पत्र पाठवले आहे. जर योग्य कारवाई केली नाही आणि गुंडांना आळा घातला नाही तर आम्ही पेट्रोल पंप संध्याकाळी ७ वाजेपर्यंतच सुरू ठेवू. त्यानंतर एक थेंबही पेट्रोल मिळणार नाही असे आम्ही त्यांना सांगितले होते, असे दारूवाला यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, पेट्रोल पंप अत्यावश्यक वस्तू असल्यामुळे पेट्रोल पंप बंद करता येत नाही. अमितेश कुमार हे सक्षम अधिकारी आहेत. आम्हाला आशा आहे की ते यावर तोडगा काढतील आणि पेट्रोल पंपावरील कर्मचारी आणि चालकांना संरक्षण देतील अशी आम्हाला आशा असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. पण या निर्णयामुळे रात्री सात नंतर पुण्यातील पेट्रोल पंप बंद झाल्यावर वाहन चालकांची मोठी तारांबळ होणार आहे. हेही वाचा : हवाईदल प्रमुखांच्या ‘त्या’ विधानाची ख्वाजा आसिफला धडकी ; म्हणाले,”भारत सीमेवर हल्ला..”