इलियाना डिक्रूझ लग्नाशिवाय होणार आई ? अभिनेत्रीने सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत.. चाहते म्हणतात, वडील कोण ?

मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझ मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी ती अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. यावेळीही असेच काहीसे घडले आहे. अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली, ज्यावरून लोक इलियाना प्रेग्नंट असल्याचा अंदाज लावत आहेत.तसेच ती आई होणार असल्याचे देखील अनेकजण तर्क लावत आहेत.
इलियाना डिक्रूझने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर दोन फोटो शेअर केले आहेत. यापैकी एकामध्ये न्यू बॉर्न बेबीचा बॉडीसूट दिसत आहे, ज्यावर ‘आता ऍडव्हेंचर सुरु’ असे लिहिले आहे. त्याचवेळी दुसऱ्या फोटोमध्ये एक लॉकेट दिसत आहे, ज्यावर ‘मम’ अर्थात आई असे लिहिले आहे. इलियानाच्या माध्यमातून शेअर केलेल्या या पोस्टने सोशल मीडिया विश्वात खळबळ उडाली आहे. अनेकांनी हे पाहून लोकांनी तिचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली आहे.
फोटो शेअर करताना अभिनेत्रीने एक धक्कादायक कॅप्शनही दिले आहे. इलियानाने लिहिले, ‘कमिंग सून.. कांट वेट टू मीट यु माय लिटिल डार्लिंग’ इलियानाची ही पोस्ट पाहून चाहते खूश झाले आहेत. तसेच इलियानाचे लग्न झालेले नाही, त्यामुळे लोक तिला मुलाच्या वडिलांबद्दल प्रश्न विचारताना दिसतात.
View this post on Instagram
‘तुझे लग्न कधी झाले?’ ‘मुलाचे वडील कोण आहे?’ असे प्रश्न चाहते विचारत आहेत. इलियानाने या पोस्टद्वारे ती प्रेग्नंट असल्याचे स्पष्ट केले नसले तरी हे फोटो पाहून चाहते तिच्या प्रेग्नेंसीबाबत अंदाज लावत आहेत. इलियानाची हि पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.





