इलियानाने पापाराझींना मुलांचे फोटो काढू न देण्यामागचे सांगितले कारण…

Ileana D’Cruz | अभिनेत्री इलियाना डिक्रूझ सध्या सिनेसृष्टीपासून दूर आहे. आता इलियाना तिचा पती मायकेल डोलन आणि तिच्या दोन मुलांसह टेक्सासमध्ये राहत आहे. नुकतेच एका मुलाखतीत तिने पापाराझींना तिच्या मुलांचे फोटो काढू न देण्यामागचे कारण सांगितले आहे.
इलियाना म्हणाली, “मुलांबरोबर फोटो काढणे कठीण आहे. कारण त्यांना काय चालले आहे ते समजत नाही. मी मुलांचे फोटो काढण्याच्या बाजूने नाही. माझी मुले अजूनही खूप लहान आहेत, त्यांना सतत पाठलाग करणे आणि फोटो काढणे हे पूर्णपणे समजणार नाही. मुलांसाठी ते गोंधळात टाकणारे आहे.”
इलियानाने मुंबईच्या पापाराझींच्या अनुभवांबद्दल सांगितले की, “माझे मुंबईच्या पापाराझींशी चांगले संबंध आहेत आणि मी जेव्हा मी त्यांना फोटो काढू नका, असे सांगितले. तेव्हा त्यांनी माझ्या इच्छेचा आदर केला. त्यामुळे जरी असे काही झाले तरी मला वाटते की ते समजून घेतील आणि मुलांचे फोटो काढणार नाहीत.” दरम्यान, इलियानासह अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या लहान मुलांच्या फोटोबाबत गोपनीयता बाळगण्यास सांगितले आहे. Ileana D’Cruz |
इलियाना डिक्रूझच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती २०१२ मध्ये ‘बर्फी’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. यात तिच्यासोबत रणबीर कपूर मुख्यभूमिकेत होता. अलीकडेच इलियाना ‘दो और दो प्यार’ चित्रपटात दिसली होती. Ileana D’Cruz |
हेही वाचा:
शाहिद कपूरच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज; सुप्रसिद्ध अभिनेत्रीची होणार एन्ट्री





