Ileana dcruz | Raid 2 : गेल्या महिन्यात अभिनेता अजय देवगणचा ‘रेड २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, या चित्रपटाने बरीच प्रसिद्धी मिळवली होती. या चित्रपटात जुन्या कलाकारांचा समावेश होता, परंतु ‘इलियाना’ऐवजी मालिनी पटनायकच्या भूमिकेत अभिनेत्री वाणी कपूरला कास्ट करण्यात आले होते. सुरुवातीला सर्वांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असले तरी, अभिनेत्रीने ही भूमिका खूपच चांगल्या प्रकारे साकारली आहे. इलियाना गेल्या वर्षी ‘दो और दो प्यार’ या चित्रपटात दिसली होती, त्यानंतर तिच्या चाहत्यांना आशा होती की ती ‘रेड २’ मध्ये दिसेल पण तसेच झाले नाही. २०१८ मध्ये अजय देवगणचा ‘रेड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, हा चित्रपट लोकांना खूप आवडला होता. लोकांना इलियाना आणि अजय देवगणची जोडीही आवडली होती. पण, या चित्रपटात तिची जागा वाणी कपूरने घेतली. अलिकडेच इलियानाने ‘रेड २’ चा भाग नसल्याबद्दल सांगितले आहे. तिने सांगितले की ‘रेड’ हा एक खूप खास चित्रपट आहे आणि मालिनी पटनायकची भूमिका साकारणे त्याहूनही खास होते. ‘मला एका चित्रपटाची ऑफर आली होती’ : अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम आयोजित केला होता, ज्यामध्ये तिच्या चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. त्यापैकी एकाने, ‘रेड २’ची आठवण करून देत, तिच्या चित्रपटांमध्ये पुनरागमनाबद्दल विचारले. यावर, अभिनेत्रीने उत्तर दिले, ‘रेड २’ च्या निर्मात्यांनी मला चित्रपटाची ऑफर दिली होती, परंतु आम्ही वेळापत्रक ठरवू शकलो नाही कारण मी अलीकडेच माझ्या मुलाला जन्म दिला आहे आणि सध्या माझ्या प्राधान्यक्रम खूप वेगळ्या आहेत. असं तिने यामध्ये सांगितलं आहे. वाणी कपूरचे कौतुक केले : इलियानाने चित्रपटातील वाणीच्या अभिनयाचेही कौतुक केले. ती म्हणाली, “मला वाटते की मी पाहिलेल्या सर्व प्रोमोमध्ये वाणी खूपच गोंडस दिसत होती आणि मला खात्री आहे की तिने तिच्या भूमिकेत तिचा गोंडसपणा आणला आहे. अभिनेत्रीने चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि अजयसोबत काम करणे हा तिचा चांगला अनुभव असल्याचे सांगितले. राज कुमार गुप्ता दिग्दर्शित ‘रेड २’ १ मे २०२५ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात रितेश देशमुख खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. रितेशने दादाभाई हे पात्र साकारले आहे.