Actress Ileana D’Cruz : दुसऱ्यांदा आई झाली इलियाना डिक्रूझ; इन्स्टाग्राम पोस्टद्वारे दिली आनंदाची बातमी

Actress Ileana D’Cruz : बऱ्याच काळापासून सिनेसृष्टीपासून दूर असलेली अभिनेत्री इलियाना डिक्रूझ हिने दुसऱ्यांदा गूड न्यूज दिली आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. इलियाना डिक्रूझ दुसऱ्यांदा आई झाली असून तिने इंस्टाग्रामवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. अभिनेत्रीने पोस्टमध्ये तिच्या बाळाची पहिली झलक दाखवली आहे. या पोस्टवर तिला चाहते शुभेच्छा देत आहे.
गेल्या बऱ्याच काळापासून इलियाना चित्रपटसृष्टीपासून दूर होती पण, ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असायची. इलियानाने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी नाते घट केले आहे. तिच्या नव्या पोस्टने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. या पोस्टमध्ये इलियाने फोटोच्या कॅप्शनमध्ये ‘माझे हृदय भरले आहे’. असे लिहिले आहे. अनेक युजर्सने या पोस्टला लाईक करत शुभेच्छांच्या कमेटं करत आहेत.
View this post on Instagram
इलियानाच्या पोस्टवर अभिनेत्री प्रियांका चोप्राने ‘सुंदर मुलगी, तुला शुभेच्छा.’ अशी कमेंट केली आहे. अभिनेत्री विद्या बालनने या पोस्टवर कमेंट केली, ‘शुभेच्छा. देव तुम्हा सर्वांचे रक्षण करो.’ इलियानाची ही पोस्ट खूप व्हायरल होत आहे. अभिनेत्री मलायका अरोरानेही तिच्या पोस्टवर कमेंट करत तिचे अभिनंदन केले आहे. अभिनेत्री अथिया शेट्टीनेही इलियानाच्या पोस्टवर कमेंट करून तिचे अभिनंदन केले आहे.
इलियानाने मे २०२३ मध्ये मायकल डोलनशी लग्न केले होते. ऑगस्ट २०२३ मध्ये इलियानाने पहिल्या बाळाला जन्म दिला. ऑक्टोबर २०२४ मध्ये तिच्या दुसऱ्या गरोदरपणाची घोषणा झाली होती.
हेही वाचा : शेफाली जारीवालाचा ‘या’ गंभीर आजाराने मृत्यू? स्वतःच केला होता खुलासा, काय म्हणाली होती पाहा…





