इलियाना डिक्रुज दुसऱ्यांदा होणार आई; शेअर केला फोटो

Bollywood | अभिनेत्री इलियाना डिक्रुजने जानेवारी महिन्यात एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात तिने गेल्या वर्षभराची झलक दाखवली होती. यात तिने दुसऱ्यांदा आई होणार असल्याची हिंट दिली होती. ज्यानंतर तिच्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. यातच आता तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. यावरुन तिने आपली दुसरी प्रेग्नंसीही कन्फर्म केली आहे.
इलियाना डिक्रुजने इन्स्टाग्राम स्टोरीवर रात्री उशिरा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये कुरकुरेचे पॅकेट आहे आणि एक tums antacid चं पॅकेट आहे. यासोबत इलियानाने लिहिले, ‘तुम्ही प्रेग्नंट आहात हे न सांगता प्रेग्नंट आहात सांगा’ या कॅप्शनसोबत तिने दुसरी प्रेग्नंसी थेट जाहीर केली आहे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तिने ऑक्टोबर महिन्यात प्रेग्नंसी कीटवर प्रेग्नंट असल्याचं दाखवलं होतं. यावरुन ती पाच महिन्यांची गरोदर असल्याचा अंदाज आहे.
इलियानाने २०२३ मध्ये तिने गोंडस मुलाला जन्म दिला. कोआ फिनिक्स डोलन असे तिच्या मुलाचे नाव आहे. मात्र इलियाना लग्नाआधीच प्रेग्नंट झाल्याच्या चर्चा होत्या. नंतर तिने पतीचं चेहरा दाखवला. इलियानाने मायकल डोलनसोबत लग्न केलं आणि आता दोघंही दुसऱ्यांदा आई बाबा होणार आहेत. Bollywood |
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, इलियाना शेवटची ‘दो और दो प्यार’ मध्ये दिसली होती. यात तिच्यासोबत विद्या बालन, प्रतिक गांधी हे कलाकाराही झळकले होते. रणबीर कपूरसोबतचा तिचा ‘बर्फी’ चित्रपट देखील चांगला गाजला. Bollywood |
हेही वाचा:






