बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई; व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज

Bollywood News | अभिनेत्री इलियाना डिक्रुझने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र ‘रेड’ चित्रपटानंतर ती बॉलीवूडमध्ये दिसली नाही. त्यानंतर ती पती मायकेल डोलनसोबत परदेशात स्थायिक झाली. तिने दोन वर्षांपूर्वी एका चिमुकल्या बाळाला जन्म दिला होता. आता दुसऱ्यांदा ती आई होणार आहे. नवीन वर्षानिमित्त तिने एक व्हिडीओ शेअर केला. ज्यात तिने ती गरोदर असल्याचे सांगितले आहे.
अभिनेत्रीने 2024 मधील प्रत्येक महिन्याचे हायलाइट्स दर्शविणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. काही महिन्यांमध्ये ती व तिचा पती बाळाबरोबर वेळ घालवताना दिसतात. तर काही फोटोंमध्ये व्हेकेशनची झलक पाहायला मिळत आहे. यात ऑक्टोबर महिना दाखवताना तिने हे किट दाखवलं. व्हिडिओ शेअर करताना इलियानाने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, ‘प्रेम, शांती. आशा आहे की 2025 मध्ये हे सर्व आणि बरेच काही असेल.’ इलियानाच्या या पोस्टवर चाहते कमेंट्स करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत. Bollywood News |
View this post on Instagram
दरम्यान, इलियाना डिक्रुझच्या जोडीदाराचे नाव मायकल डोलन आहे. त्यांनी गुपचूप लग्न केलं होतं, असं म्हटलं जातं. हे दोघेही ऑगस्ट २०२३ मध्ये आई-बाबा झाले. त्यांच्या मुलाचे नाव कोआ फीनिक्स डोलन आहे. इलियाना अनेकदा मुलाचे व पतीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. Bollywood News |
इलियानाच्या कामाबद्दल बोलायचं झाले तर, बर्फी, रूस्तम, मैं तेरा हिरो, मुबारका, दो और दो प्यार या सिनेमात ती दिसली होती.
हेही वाचा:
“वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करू नका,-कारण…”; विजय वडेट्टीवारांनी सांगितली आतली बातमी





