इलियानाने चिमुकल्या लेकासोबत धमालमस्ती करतानाचा शेअर केला व्हिडिओ

Ileana DCruz| अभिनेत्री इलियाना डिक्रूझ सध्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. सोशल मीडियावर देखील ती मातृत्वाच्या अनुभवाबद्दल बोलताना दिसते. यानंतर आता इलियानाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या मुलाचा चेहरा दाखवला आहे. कोआ फिनिक्स डोलन असे तिच्या मुलाचे नाव आहे. कोआच्या जन्मानंतर आता इलियानाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात इलियानाने तिच्या लेकाचा चेहरा दाखवला आहे.
इलियानाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओत ती तिच्या लेकासोबत मातृत्वाचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीलाच इलियानाने कोआचा एक गोड फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्याने डोक्यावर हॅट, टीशर्ट परिधान केल्याचे दिसत आहे. यात ते दोघेही बाहेर फिरताना दिसत आहे. त्यासोबत तिने तिचा लेक समुद्राच्या वाळूत खेळताना, गाडीत मजा-मस्ती करताना, झोपलेला असतानाचे काही फोटो एकत्र शेअर केले आहेत. या व्हिडीओला कॅप्शन देत इलियानाने ‘बऱ्याच काळापासून माझे आयुष्य’ असे म्हटले आहे.
View this post on Instagram
सध्या तिच्या या पोस्टवर चाहत्यांसह सेलिब्रिटीं देखील कमेंट करत आईच्या आणि लेकाच्या या सुंदर नात्याचे कौतुक केले आहे. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, इलियाना शेवटची ‘दो और दो प्यार’ मध्ये दिसली होती. यात तिच्यासोबत विद्या बालन, प्रतिक गांधी हे कलाकाराही झळकले होते. रणबीर कपूरसोबतचा तिचा ‘बर्फी’ चित्रपट देखील चांगला गाजला. आता लवकरच ती ‘तेरा क्या होगा लवली’ या चित्रपटात झळकणार आहे. Ileana DCruz|
हेही वाचा:
सोनाक्षी सिन्हा लवकरच अडकणार लग्नबंधनात; ठिकाण अन् तारीखही ठरली





