”आता जर चुकाल, तर…”; भाजपच्या ‘कटेंगे तो बटेंगे’ला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर म्हणाले “मुंबईला महाराष्ट्रापासून दूर करणाऱ्यांचा…”

Uddhav Thackeray : अखेर मोठ्या प्रतिक्षेनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी युतीची अधिकृत घोषणा केली आहे. वरळी येथील पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली आहे. यावेळी राज आणि उद्धव दोघांनीही युतीबाबत आपले मत व्यक्त केले. उद्धव ठाकरे यांनी युती मागील भूमिका स्पष्ट करत भाजपच्या विधानसभा निवडणुकीसाठी वापरलेल्या ‘कटेंगे तो बटेंगे’ नाऱ्याला खणखणीत शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.
आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी. मुंबईला महाराष्ट्रापासून दूर करणाऱ्यांचा राजकीय खात्मा करण्यासाठी आम्ही आलो आहोत. तुटू नका फुटू नका मराठीचा वसा सोडू नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. विधानसभा निवडणुकीत भाजपने ‘कटेंगे तो बटेंगे’ म्हटले आता आम्ही देखील मराठी माणसाला सांगतोय, ”आता जर चुकाल, तर संपाल’, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या विधानातून त्यांनी कटेंगे तो बटेंगे नाऱ्याला उत्तर दिले आहे. तेही संयमाने. आता दोन्ही भाऊ राजकीय दृष्या एकत्र आले आहेत. एक नवी युती दोन्ही भावांच्या रुपाने जन्माला आली आहे. आता या युतीला मुंबईकर आणि इतर महापालिका क्षेत्रात असलेले नागरिक कशा प्रकारे प्रतिसाद देतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
खरं तर ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची घोषणा महापालिका निवडणुकीचा निवडणुकीच्या कार्यक्रमानंतर लगेचच होणे अपेक्षित होते. मात्र, दोन्ही पक्षांकडून मुंबईसह मुंबईला लागून असलेल्या महत्वाच्या महापालिकांवर जागावाटपात निर्णय होत नव्हता. त्यामुळे युतीची गाडी अडून राहिली होती. अखेर जागावाटपाबाबत निर्णय अंतिम झाल्यानंतरच दोन्ही भाऊ पुन्हा एकदा एकत्र आले तेही राजकीयदृष्या. आता दोघा भावांच्या (उबाठा मनसे) पक्षाला महापालिका निवडणुकीत काय फायदा होतो हे पाहवे लागणार आहे. जागावाटपाबाबत घेतलेला निर्णय लवकरच कळवला जाईल असे पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा : प्रतिक्षा संपली! ठाकरे बंधुंच्या युतीची अधिकृत घोषणा; कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा





