“… तर आधीच आत्मसमर्पण करायला हवं होतं”; वाल्मिक कराडच्या आत्मसमर्पणानंतर बजरंग सोनावणेंची प्रतिक्रिया

Bajarang Sonavane | मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या 22 दिवसानंतर वाल्मिक कराडने अखेर शरणागती पत्करली आहे. वाल्मिक कराड हा पुण्यात सीआयडीला शरण आला आहे. वाल्मिक कराड या प्रकरणाशीसंबंधित एका खंडणी प्रकरणामध्ये आरोपी आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी सोनावणे यांनी केली होती. देशमुख हत्या प्रकरणानंतर 22 दिवसांनी धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराड आज पुण्यात सीआयडीसमोर शरण आला आहे.
बजरंग सोनावणे यांची प्रतिक्रिया Bajarang Sonavane |
यावर बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “मी माझ्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्याने माध्यमांकडूनच मला ही माहिती मिळाली आहे. हत्या प्रकरणामध्ये संबंध असल्यास वाल्मीक कराडला अटक व्हायला हवी. कोणत्या गुन्हाअंतर्गत अटक करावी हे पोलिसांनी पाहायला पाहिजे.
9 तारखेला संतोष देशमुख यांची हत्या झाली. या घटनेला आता 20 -22 दिवस झाले. जर खंडणीचा गुन्हा होता, तर त्याने आधीच आत्मसमर्पण करायला हवं होतं. त्याने सीआयडीसमोर आता सरेंडर केले आहे”, असे म्हणत बजरंग सोनावणे यांनी म्हंटले आहे. Bajarang Sonavane |
दरम्यान, वाल्मिक कराडने सरेंडर होण्यापूर्वी एक व्हिडिओ शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली होती. ज्यावर बजरंग सोनावणे म्हणाले की, “दोष कुणाचा आणि राजकीय दोष कोण देतं आहे वाल्मिक कराड यांना? भाजप, अजित पवार गटाचे तीन आमदार यांनी सगळ्यानीच वाल्मिक कराडचं नाव घेतलं आहे. महायुतीचे नेतेही मागणी करत आहेत. मग त्यांचा द्वेष आहे का? या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. तपास यंत्रणांकडून एकच अपेक्षा आहे की या वाल्मिक कराडचे संबंध कुणाशी आहे ते तपासावं. तपासातून दूध का दूध आणि पानी का पानी झालं पाहिजे,” असं बजरंग सोनावणेंनी म्हटलं आहे. Bajarang Sonavane |
वाल्मिक कराड व्हिडिओत नेमकं काय म्हणाला ?
सीआयडीला शरण जाण्यापूर्वी कराडने एक व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये त्याने केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाल्याचा आरोप केला आहे. “मी वाल्मिक कराड, केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे. मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असताना, सीआयडी ऑफिस, पुणे पाषाण रोड येथे सरेंडर होत आहे.”
पुढे त्याने म्हंटले की, “संतोष भैया देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि फाशीची शिक्षा द्यावी, राजकीय द्वेषापोटी माझं नाव जोडलं जात आहे. पोलीस तपासात जे निष्कर्ष येतील आणि मी त्यात दोषी दिसलो, तर न्यायदेवता जी शिक्षा देईल, ती भोगायला मी तयार आहे,’ असे वाल्मिक कराडने व्हिडीओत म्हटले आहे.
हेही वाचा :
तृप्ती डिमरी बॉयफ्रेंडसोबत करणार न्यू इअर सेलिब्रेशन? ‘या’ ठिकाणाचे शेअर केले फोटो





