तृप्ती डिमरी बॉयफ्रेंडसोबत करणार न्यू इअर सेलिब्रेशन? ‘या’ ठिकाणाचे शेअर केले फोटो

Triptii Dimri Snowfall | ‘अॅनिमल’ या चित्रपटामुळे अभिनेत्री तृप्ती डिमरी प्रसिद्धीच्या झोतात आली. या चित्रपटाच्या यशानंतर तिला ‘नॅशनल क्रश’ असा टॅगही दिला गेला. यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. मात्र आता तिच्या वैयक्तिक आयुष्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तृप्ती सध्या फिनलंडमध्ये आहे. येथील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
फोटोमध्ये तृप्ती बॉयफ्रेंड सॅम मर्चेंटसोबत सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहे. यासोबतच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला तिनं ‘स्नोफॉल आणि स्माइल’, हा माझ्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर टप्पा आहे, असं कॅप्शन दिले आहे. व्हिडिओमध्ये तृप्ती लाल रंगाच्या आउटफिटमध्ये दिसत असून तिने काळ्या रंगाची टोपी घातली होती. Triptii Dimri Snowfall |
View this post on Instagram
;
यावेळी सॅम मर्चंटनेही बर्फवृष्टीचा आनंद लुटताना अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याच्या व्हिडिओंमध्ये दिसणारे तेच चित्र तृप्तीच्या सिनेमातही दिसली. यात तो काळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये दिसत आहे. Triptii Dimri Snowfall |
सॅम मर्चंटबद्दल बोलायचे तर, तो एक बिझनेसमन आहे. त्यानं मॉडेलिंगही केले आहे. त्याने 2002 मध्ये Gladrags Manhunt Contest जिंकली आहे. त्याचे गोव्यासह इतर ठिकाणी बीच क्लब आणि अनेक हॉटेल्स आहेत.
तृप्तीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती शेवटची ‘भुल भुलैया 3’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात कार्तिक आर्यन, विद्या बालन, माधुरी दीक्षित सारखे स्टार्स होते. आता ती ‘धडक २’ या चित्रपटात दिसणार आहे.
नव्या वर्षी काम सुरू होणाऱ्या आठ ते दहा चित्रपटांसाठी तिला विचारणा केल्याचे म्हंटले जात आहे. मनोरंजनसृष्टीत कुणीही गॉडफादर नसताना तृप्तीनं तिच्या अभिनयाच्या जोरावर आपली जागा निर्माण केली आहे.
हेही वाचा:





