Prajakta Hamanghar : ‘व्यवस्थेत चुकीचं घडत असेल तर…’; राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याला मराठी अभिनेत्रीचा जाहीर पाठिंबा
Prajakta Hamanghar : अशातच मराठी मनोरंजनसृष्टीतील एका अभिनेत्रीने या कार्यक्रमाला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.

Prajakta Hamanghar : नीट पेपरफुटी प्रकरणावरून पेटलेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर देशातील शिक्षणव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याच मुद्यावरून विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी ‘छात्रों की गुंज’ हे अभिनयान सुरू केले असून, २२ अॅागस्टला पुण्यात हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमासाठी एस.एस.पी.एम. मैदानावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पुण्यात राहुल गांधी हे सुमारे ८ ते १० हजार विद्यार्थिनींशी थेट संवाद साधणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. या कार्यक्रमावरून राजकारण तापले आहे. अशातच मराठी मनोरंजनसृष्टीतील एका अभिनेत्रीने या कार्यक्रमाला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.
जर व्यवस्थेत काही चुकीचं घडत असेल, तर आम्ही स्त्रिया त्यांना प्रश्न विचारणारच
अभिनेत्री प्राजक्ता हमनघर हिने ‘जय शिव-फुले-शाहू-आंबेडकर’च्या जयघोषाने सुरुवात केली. ती म्हणाली “पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत आणि सामान्यांचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची मोठी मदत होते. आजच्या काळात बोलणं अत्यंत गरजेचं झालं आहे. आपल्या महाराष्ट्रात कायमच सत्ताधाऱ्यांना थेट प्रश्न विचारण्याची एक गौरवशाली परंपरा राहिलेली आहे. मग विरोधक कुणीही असोत किंवा सत्ताधारी कोणीही असोत; जर व्यवस्थेत काही चुकीचं घडत असेल, तर आम्ही स्त्रिया त्यांना प्रश्न विचारणारच. कारण चुकीच्या गोष्टीला चूक न म्हणणं, हे मला थेट मानसिक गुलामगिरीची शेवटची पायरी वाटते.” असे मत अभिनेत्री प्राजक्ता हमनघर हिने व्यक्त केले.
पुण्यात होणाऱ्या छात्रों की गूंजला अभिनेत्री मा. प्राजक्ता हनमघर यांचा पाठिंबा !
छात्रों की गूंज ✊
विद्यार्थिनी विशेष 👩🎓– 22 ऑगस्ट शनिवारी
– संध्या. 5 वाजता
– AISSMS ग्राउंड पुणे pic.twitter.com/8NBEM5xS7W— Maharashtra Congress (@INCMaharashtra) August 20, 2026
“राहुलजी २२ तारखेला पुण्यात येत आहेत. महिलांसाठी येत आहेत. हे स्वराज्य जननी जिजामातांचं पुणं आहे हे आद्य शिक्षिका तुमची माझी आई सावित्रीबाईचं पुणं आहे हे पंडित रमाबाईंचं पुणं आहे हे ज्वलंत निबंध लिहिलेल्या मुक्ता साळवेंचं पुणं आहे. इतक्या सगळ्या ज्वलंत आणि जिवंत बायका इथे होऊन गेलेल्या आहेत.” असे म्हणत अभिनेत्रीने राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्याला जाहीर पाठिंबा दर्शवला.
पुण्यात कसा प्रतिसाद मिळतो याकडे लक्ष
या संवादादरम्यान विविध परीक्षांमधील पेपरफुटी, शिक्षणाचा वाढता खर्च, रोजगार यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर राहुल गांधी थेट भाष्य करणार आहेत. त्यामुळे आता छात्रो की गुंज या कार्यक्रमाला पुण्यात कसा प्रतिसाद मिळतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राहुल गांधी यांच्या पुण्यात होणाऱ्या छात्रों की गुंज या कार्यक्रमावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे.
Pune News : मनातील नकारात्मकतेचा विषारी विचार दूर करा आणि आनंदी जीवन जगा : डॉ. बी. के. शक्तीराज





