Rahul Gandhi : ज्ञानेश कुमार यांची अवैध कृती सिद्ध; राहुल गांधी यांची टीका
राहुल (Rahul Gandhi) आणि कॉंग्रेसच्या इतर नेत्यांनी कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. लोकशाहीवर गुन्हेगारी स्वरूपाचा हल्ला करण्यात आला.

Rahul Gandhi : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी फॉर्म-६ मध्ये अवैध आणि एकतर्फी बदल केल्याचे नि:संशयपणे सिद्ध झाले. ती बाब म्हणजे कुमार यांनी भाजपच्या मदतीसाठी पदाचा गैरवापर केल्याचा आणखी एक पुरावा आहे, असा शाब्दिक हल्लाबोल कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला.
निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी एक निवेदन जारी केले. फॉर्म-६ मधील बदलाला सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिल्याचे त्यामध्ये नमूद करण्यात आले. मात्र, तशी कुठली मंजुरी दिली नसल्याचे खुद्द न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले. त्यानंतर राहुल (Rahul Gandhi) आणि कॉंग्रेसच्या इतर नेत्यांनी कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. लोकशाहीवर गुन्हेगारी स्वरूपाचा हल्ला करण्यात आला.
त्यामध्ये सामील असणाऱ्या कुमार आणि इतर प्रत्येकाला उत्तरदायी ठरवण्यात येईल, असा इशारा राहुल यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेन-झीमुळे धास्तावले आहेत. जेन-झी मतदारांना वगळण्यासाठी स्वत: कुमार यांनी फॉर्म-६ मध्ये मुद्दाम बदल केला.
त्यासंदर्भात ते खोटे बोलल्याचे स्पष्ट झाले, असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी म्हटले. पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही प्रतिक्रिया दिली. निवडणुकांमध्ये हेराफेरी होत असल्याचे आता जनतेच्या ध्यानात येऊ लागले आहे, अशी टिप्पणी (Rahul Gandhi) त्यांनी केली.






