Rahul Gandhi: “महिलांचा आवाज दाबायचा आहे का?” ; राहुल गांधींचा अमित शाह, दिल्ली पोलिसांवर हल्लाबोल
Rahul Gandhi: लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी दिल्लीतील आंदोलक आणि महिलांवरील कथित पोलीस कारवाईवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि दिल्ली पोलिसांवर निशाणा साधला आहे.

Rahul Gandhi: लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी दिल्लीतील आंदोलक आणि महिलांवरील कथित पोलीस कारवाईवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि दिल्ली पोलिसांवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी आरोप केला की, दिल्लीत सध्या एक विशिष्ट पद्धत दिसून येत आहे: प्रश्न विचारणाऱ्या महिलांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.
जंतर मंतर याठिकाणी झालेल्या कारवाईचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले की, तेथे शेकडो लोकांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी दावा केला की, महिला आंदोलकांनी पुरुष पोलीस अधिकाऱ्यांवर गैरवर्तनाचा आरोप केला आहे.
महिला पत्रकारांचे कॅमेरे हिसकावून त्यांना फरफटत नेल्याचेही आरोप आहेत. राहुल गांधी म्हणाले की, एका पत्रकाराच्या तक्रारीवर एफआयआरसुद्धा दाखल करण्यात आला नाही.
काँग्रेस नेत्याने साकेत पोलीस ठाण्यातील घटनेचाही उल्लेख केला. त्यांनी प्रश्न विचारला की, ज्या पोलीस ठाण्यात महिला तक्रार दाखल करायला जातात, त्याच पोलीस ठाण्यात त्यांच्यासोबत अशा वागणुकीचा आरोप होत असेल, तर परिस्थिती गंभीर आहे.
राहुल गांधी यांनी आरोप केला की, महिलांच्या सुरक्षेसाठी जबाबदार असलेलेच त्यांच्यासाठी धोका निर्माण करत आहेत. दिल्ली पोलीस केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येते, हे निदर्शनास आणून देत त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांना थेट लक्ष्य केले.
साकेत पोलीस ठाण्याचे संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करावे आणि दोषी आढळलेल्या पोलिसांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. त्यांनी महिलांना न्याय मिळावा अशी मागणी केली. आपल्या भाषणाचा समारोप करताना राहुल गांधी यांनी गृहमंत्री अमित शाह यांना प्रश्न विचारला, “अमित शाहजी, तुम्ही आणि तुमचे पोलीस महिलांना का घाबरता?”







