ICC Women’s T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषकासाठी श्रीलंकेचा संघ जाहीर,अनुभवी खेळाडूवर सोपविली कर्णधारपदाची धूरा…

Sri Lanka squad for the ICC Women’s T20 World Cup 2024 : – श्रीलंका क्रिकेट बोर्डाने ICC महिला T20 विश्वचषक-2024 साठी आपला संघ जाहीर केला आहे. संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये खेळल्या जाणाऱ्या या विश्वचषकाला 3 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे.
टी-20 विश्वचषकातील श्रीलंका क्रिकेट संघाची कमान चामरी अथापट्टूकडे देण्यात आली आहे. चामारी अथापट्टूच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघाने नुकतेच महिला आशिया चषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. कर्णधार चमारी अटापट्टूच्या नेतृत्वाखालील अनुभवी इनोका रणवीराने संघात पुनरागमन केले आहे. इनोका रणवीराला 12 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असल्याने महत्वाच्या स्पर्धेसाठी तिला पुन्हा बोलाविण्यात आले आहे.
Sri Lanka become the 10th and last team to confirm their ICC Women’s #T20WorldCup 2024 squad 🤩https://t.co/dFDJq78WOY
— ICC (@ICC) September 20, 2024
विश्वकरंडक स्पर्धेचा पात्रता फेरीदरम्यान तिने श्रीलंका संघासाठी शेवटचा सामना खेळाला होता. चमारी अटापट्टूच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेने गेल्या दीड वर्षात चमकदार कामगिरी केली आहे. नुकतेच श्रीलंका संघाने आशिया करंडक स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. श्रीलंकेने टी-20 विश्वचषकाच्या क्वालिफायर सामन्यांमध्येही चमकदार कामगिरी केली आहे. आणि त्यांचा संघ अजेय राहिला आहे. महिला T20 विश्वचषक 2024 मध्ये, श्रीलंकेचा संघ ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड आणि पाकिस्तानसह अ गटात आहे. श्रीलंका टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तानपासून मोहिमेची सुरुवात करणार आहे.
श्रीलंका संघ : चमारी अटापट्टू (कर्णधार), अनुष्का संजीवनी, हर्षिता माधवी, नीलाक्षिका डी सिल्वा, इनोका रणवीरा, हसिनी परेरा, कविशा दिलहरी, सचिनी निसानसाला, विश्मी गुणारा तने, उदेशिका प्रबोधनी, अचिनी कुलसूरिया, सुगंधी कुमारी, सुगंधी कुमारी, सुगंधिका प्रबोधिनी. कांचना. राखीव खेळाडू : कौशिनी नूत्यांगना.





