दुबई :- भारतीय ऑफस्पिनर दीप्ती शर्माने घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध संपलेल्या मालिकेत चमकदार कामगिरी केल्यामुळे मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद जाहीर केलेल्या महिलांच्या एकदिवसीय गोलंदाजी क्रमवारीत पाचव्या स्थानावर पोहोचली आहे. दीप्तीचे आता 665 रेटींग्स झाले असून चौथ्या क्रमांकावर असलेली दक्षिण आफ्रिकेच्या मारिजने कॅप व दीप्तीमध्ये केवळ 12 रेटिंग्सचे अंतर आहे. दीप्ती शर्माने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांत 8 बळी टिपले होते. शेवटच्या एकदिवसीय लढतीमध्ये तिने 31 धावांत 06 बळी टिपल्याने भारताला वेस्ट इंडिज संघाला व्हाइट वॉश देता आला. फलंदाजांच्या यादीत भारताची मधल्या फळीतील फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्स 537 गुणांसह अव्वल 20व्या खेळाडूंमध्ये स्थिरावली आहे. मालिकेत 29 आणि 52 धावांची खेळी खेळल्यानंतर तिला चार स्थानांचा फायदा झाला असून ती आता 18 व्या स्थानावर पोहोचली आहे. आक्रमक फलंदाज ऋचा घोषलाही 7 स्थानांचा फायदा झाला असून ती 41व्या स्थानावर आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावल्यानंतर वेस्ट इंडिजच्या चेनेल हेन्रीने 21 स्थानांनी झेप घेत 65 व्या स्थानावर पोहोचली आहे. FIDE World Rapid chess C’ship 2024 | कोनेरू हम्पीने रचला इतिहास! दुसऱ्यांदा जिंकले जागतिक जलद बुद्धिबळाचे विजेतेपद… स्मृती मंधानाची एका स्थानानं घसरण…. मालिकेत दोन अर्धशतके झळकावणारी भारताची स्टार सलामीवीर स्मृती मंधाना (720 गुण) मात्र एका स्थानाने घसरून तिसऱ्या स्थानावर आली आहे. त्यांच्या पुढे दक्षिण आफ्रिकेची लॉरा वोलवॉर्ट (773) आणि श्रीलंकेची चमरी अटापट्टू (733) आहेत. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर तीन स्थानांच्या नुकसानासह 13व्या स्थानावर आहे.