FIDE World Rapid chess C’ship 2024 | कोनेरू हम्पीने रचला इतिहास! दुसऱ्यांदा जिंकले जागतिक जलद बुद्धिबळाचे विजेतेपद…

FIDE women’s World rapid chess championship 2024 :– भारताच्या कोनेरू हम्पीने (Koneru Humpy) दुसऱ्यांदा जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. न्यूयॉर्क येथे खेळल्या गेलेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत हम्पीने इंडोनेशियाच्या इरेन सुखंदरचा पराभव केला.
यापूर्वी, 2019 मध्ये जॉर्जिया येथे झालेल्या या स्पर्धेत हम्पीने विजेतेपद पटकावले होते. भारताची नंबर 1 खेळाडू चीनच्या झू वेनजुननंतर एकापेक्षा जास्त वेळा विजेतेपद पटकावणारी दुसरी खेळाडू आहे. 37 वर्षीय हम्पीने 11 पैकी 8.5 गुणांसह स्पर्धा पूर्ण केली.
Grandmaster Koneru Humpy is the Women’s World Rapid Champion 2024 scoring 8.5/11 points! She scored the all-important win against Irene Sukandar with the Black pieces in the final round to win the tournament.
This is Humpy’s 2nd Women’s World Rapid title after her win in 2019!… pic.twitter.com/fBVKImBmSz
— ChessBase India (@ChessbaseIndia) December 28, 2024
नॅशनल बॉईज विजेतेपद पटकावणारी हम्पी ही पहिली भारतीय महिला होती. ग्रँड मास्टर बनणारी ती भारतातील पहिली महिला खेळाडू आहे. 2600 इलो गुण मिळवणारी ती दुसरी महिला खेळाडू आहे. तिचे वडील अशोक कोनेरू यांनी वयाच्या ५ व्या वर्षी कोनेरूची बुद्धीबळाबद्दलची रुची ओळखून तिच्या स्वप्नांना पंख देण्याचे काम केले.
विशेष म्हणजे, प्राध्यापक असणारे अशोकही चांगले बुद्धिबळ खेळायचे. प्रारंभी त्यांनीच कोनेरूला प्रशिक्षण दिले. आपल्या मुलीची बुद्धिबळाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्यांनी नोकरीही सोडली आणि तिला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. वयाच्या 6 आणि 7 व्या वर्षी कोनेरूने राज्य चॅम्पियनशिप जिंकली. यानंतर ती 12, 14, 16 वर्षाखालील राष्ट्रीय विजेती ठरली.
बुद्धिबळात भारताची यंदा चांगली कामगिरी
बुद्धिबळात भारताची यंदाची कामगिरी चांगली झाली आहे. डी. गुकेशने 12 डिसेंबर रोजी जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये चीनच्या डिंग लिरेनचा 7.5-6.5 असा पराभव केला होता. एवढ्या कमी वयात विजेतेपद पटकावणारा गुकेश हा जगातील पहिला खेळाडू आहे. यापूर्वी 1985 मध्ये रशियाच्या गॅरी कास्पारोव्हने वयाच्या 22 व्या वर्षी हे विजेतेपद पटकावले होते. त्याचवेळी, सप्टेंबरमध्ये बुडापेस्ट, हंगेरी येथे झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताने खुल्या आणि महिला गटात ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले. ऑलिम्पियाडच्या 97 वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारताने दोन्ही प्रकारांमध्ये प्रथम स्थान मिळविले होते.
रशियाच्या मुर्झिनने पुरुषांचा विजेता
रशियाच्या 18 वर्षीय वोलोदार मुर्झिनने पुरुषांचे विजेतेपद पटकावले. फिडे वर्ल्ड रॅपिड चॅम्पियन जिंकणारा मुर्झिन हा दुसरा सर्वात तरुण खेळाडू आहे. त्याच्या आधी नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हने वयाच्या 17 व्या वर्षी विजेतेपद पटकावले होते.





