Jaiswal Fernando Fine : आयसीसीची मोठी कारवाई! यशस्वी जैस्वाल आणि असिथा फर्नांडोला सुनावली ‘ही’ शिक्षा
Jaiswal Fernando Fine : आयसीसीने यशस्वी जैस्वाल आणि असिथा फर्नांडो यांच्यावर शिस्तभंगाची मोठी कारवाई केली आहे.

ICC Fined Yashasvi Jaiswal and Asitha Fernando 25 Percent Match Fees : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान झालेल्या वादग्रस्त राड्यानंतर आयसीसीने भारतीय सलामीवीर यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज असिथा फर्नांडो (Asitha Fernando) यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. मैदानातील शारीरिक झटापटीची गंभीर दखल घेत आयसीसीने दोन्ही खेळाडूंना त्यांच्या मॅच फीच्या २५ टक्के दंड ठोठावला असून, प्रत्येकी १ डिमेरिट पॉइंट (Demerit Point) दिला आहे. मात्र, या दोघांवर सामन्यांची बंदी न घालण्यात आल्याने भारतीय संघाला मोठा दिलासा मिळाला आहे.
आचारसंहितेच्या कलम २.१२ चे उल्लंघन; दोघांवरही दंडात्मक कारवाई!
आयसीसीच्या तपासणीत दोन्ही खेळाडू आचारसंहितेच्या कलम २.१२ (Article 2.12) चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळले. हे कलम प्रतिस्पर्धी खेळाडू, सपोर्ट स्टाफ किंवा पंचांसोबत अयोग्य शारीरिक संपर्क (Inappropriate Physical Contact) करण्याशी संबंधित आहे. गेल्या २४ महिन्यांत दोघांच्याही नावावर कोणतीही आधीची चूक नोंदवलेली नसल्यामुळे त्यांच्यावरील कारवाई केवळ दंडापुरती मर्यादित ठेवण्यात आली. उभय खेळाडूंनी आपली चूक अधिकृतपणे मान्य केल्याने या प्रकरणात कोणतीही स्वतंत्र सुनावणी घेण्याची आवश्यकता पडली नाही.
नेमकी कशी घडली होती मैदानातील घटना?
Banter is part of cricket. But where do you draw the line? 👀
Cheteshwar Pujara and Saba Karim discuss the Yashasvi Jaiswal-Asitha Fernando incident and why emotions need to stay in check on the field.
Watch #SLvIND 2nd Test | Day 2 TOMORROW at 9 AM, LIVE on Sony Sports… pic.twitter.com/DwQhotYr38
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 23, 2026
कोलंबो कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय डावाच्या १७ व्या षटकात ही घटना घडली होती. फर्नांडोने जैस्वालला ४५ धावांवर क्लीन बोल्ड केल्यानंतर आक्रमक सेंड-ऑफ दिला. यावर संतापलेला जैस्वाल फर्नांडोकडे वळला आणि दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. दरम्यान, फर्नांडोने डोके पुढे केले असता जैस्वाल खाली झुकल्याने दोघांचे डोके एकमेकांना आदळले होते. परिस्थिती गंभीर होताच मैदानावरील पंचांनी मध्यस्थी करून वाद मिटवला होता.
कसोटी मालिकेत जैस्वालच्या मोठ्या खेळीची प्रतीक्षा कायम –
The ICC have confirmed the sanctions for Yashasvi Jaiswal and Asitha Fernando following their incident during the second #WTC27 contest in Colombo.https://t.co/jYf9ImTHfA
— ICC (@ICC) August 24, 2026
या कसोटीत यशस्वी जैस्वालने ५३ चेंडूंत ९ चौकारांच्या मदतीने ४५ धावांची खेळी केली खरी, मात्र त्याला या खेळीचे मोठ्या शतकात रूपांतर करता आले नाही. या संपूर्ण कसोटी मालिकेत जैस्वालच्या बॅटमधून अद्याप मोठी खेळी पाहायला मिळालेली नाही. गॉल येथील पहिल्या कसोटीत त्याने पहिल्या डावात ३२ धावा केल्या होत्या, तर दुसऱ्या डावात तो खातंही न उघडता शून्यावर बाद झाला होता. त्यामुळे आता दुसऱ्या डावात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.





