IBPS Exam Calendar 2023-24: आईबीपीएस, आरआरबीने जाहीर केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या कधी कोणती भरती?

बँकिंग कर्मचारी निवड संस्थेने (IBPS) वर्ष 2023-24 साठी तात्पुरते परीक्षा वेळापत्रक जारी केले आहे. आईबीपीएस परीक्षा वेळापत्रक त्यांची आधिकारिक वेबसाइट ibps.in वर उपलब्ध आहे. उमेदवार तिथे चेक करू शकतात. वेळापत्रकानुसार आईबीपीएस, आरआरबी ऑफिस असिस्टेंट आणि ऑफिसर स्केल1 साठीची पूर्व परीक्षा 2023च्या ऑगस्ट महिन्यात होणार आहे. तर मुख्य परीक्षा सप्टेंबर महिन्यात होणार आहे.
बँकिंग कर्मचारी निवड संस्था (IBPS) द्वारे प्रसिद्ध झालेल्या वेळापत्रकानुसार RRB ऑफिसर स्केल ( II) आणि ( III ) साठी एकच परीक्षा 10 सप्टेंबर रोजी घेतली जाईल. प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये (RRB) अधिकारी आणि कार्यालयीन सहाय्यकांच्या भरतीसाठी या परीक्षा घेतल्या जातील.
आईबीपीएस क्लर्कसाठीची पूर्व परीक्षा ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये आयोजित केली जाणार असून आईबीपीएस क्लर्कची मुख्य परीक्षा प्रसिद्ध झालेल्या वेळापत्रकानुसार ऑक्टोबर महिन्यात पार पडणार आहे. प्रोबेशनरी ऑफिसर्स आणि स्पेशालिस्ट ऑफिसर्ससाठीची पूर्व परीक्षा अनुक्रमे सप्टेंबर, ऑक्टोबर आणि डिसेंबरमध्ये घेतली जाईल. यासह नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे की, उमेदवारांना तपशीलवार अधिसूचनेसाठी नियमितपणे IBPSच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
IBPS Exam Calendar 2023-24 परीक्षा कार्यक्रम –
RRB ऑफिस असिस्टंट आणि ऑफिसर स्केल ( I ) साठी पूर्व परीक्षा 05, 06, 12, 13, 19 ऑगस्ट रोजी होणार आहे. ऑफिसर स्केल ( I ) मुख्य परीक्षा 10 सप्टेंबर रोजी आणि ऑफिस असिस्टंट परीक्षा 16 सप्टेंबर रोजी होणार आहे. आरआरबी अधिकारी स्केल ( II )आणि (III ) साठी एकच परीक्षा 10 सप्टेंबर 2023 रोजी होईल.
आईबीपीएस क्लार्कची परीक्षा 26 ऑगस्ट, 27सप्टेंबर, 02 सप्टेंबर आणि मुख्य परीक्षा 07ऑक्टोबरला होणार आहे.
IBPS PO परीक्षा 23 सप्टेंबर, 30 ऑक्टोबर, 01 नोव्हेंबर आणि मुख्य परीक्षा 05 नोव्हेंबर रोजी होईल.
IBPS SO पूर्वपरीक्षा 30 आणि 31 डिसेंबर रोजी होणार आहे, तर मुख्य परीक्षा 28 जानेवारी 2024 रोजी होणार आहे.






