IAS Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली? अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळांनी स्पष्टचं सांगितलं
IAS Tukaram Mundhe : धडाकेबाज आयएएस अधिकारी आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संभाव्य बदलीबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे.

IAS Tukaram Mundhe : अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीबाबत सुरू असलेल्या चर्चांवर अखेर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत मोठे स्पष्टीकरण दिले आहे. मुंढे यांच्या बदलीचा कोणताही प्रश्न नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी FDA विभागाकडून सुरू असलेल्या कारवायांचे कौतुक केले. (IAS Tukaram Mundhe)
अन्न व औषध प्रशासन विभागाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळ, बनावट औषधे आणि बेकायदेशीर व्यवसायांविरोधात धडक कारवाया सुरू केल्या आहेत. त्यामुळे अनेक व्यावसायिक आणि अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या बदलीच्या चर्चांनाही वेग आला होता. (IAS Tukaram Mundhe)
‘मुंढेंच्या बदलीचा प्रश्नच नाही’
विधानसभेत बोलताना अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले, “एफडीएकडून सध्या प्रभावी कारवाई सुरू आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा प्रश्नच उद्भवत नाही. विभागातील अधिकाऱ्यांकडे पुरेशा सुविधा नाहीत. अनेक ठिकाणी वाहने आणि कार्यालयांचीही कमतरता आहे. या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.” (IAS Tukaram Mundhe)
मुनगंटीवारांचा मुंढेंना पाठिंबा
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही मुंढेंच्या कामाचे कौतुक करत, “तुकाराम मुंढे यांच्यातील ‘टी’ आता ‘टायगर’मधील ‘टी’ झाला आहे. ते उत्कृष्ट काम करत आहेत. अशा अधिकाऱ्यांना किमान तीन वर्षे एकाच ठिकाणी काम करण्याची संधी मिळायला हवी,” असे मत व्यक्त केले. (IAS Tukaram Mundhe)
सुरक्षेची मागणी
शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी सभागृहात तुकाराम मुंढे यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. मुंढे यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचा दावा करत त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली. (IAS Tukaram Mundhe)
पालक सचिवपदाची जबाबदारी काढली, पण FDA आयुक्तपद कायम
दरम्यान, अलीकडेच तुकाराम मुंढे यांच्याकडील परभणी जिल्ह्याच्या पालक सचिवपदाची जबाबदारी काढून घेण्यात आली. त्यामुळे त्यांच्या बदलीच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, सरकारने स्पष्ट केले आहे की मुंढे यांची FDA आयुक्तपदावरून बदली करण्यात आलेली नाही. परभणीच्या पालक सचिवपदाची जबाबदारी आता डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. (IAS Tukaram Mundhe)
आव्हाडांचा २५० कोटींचा गंभीर आरोप
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत गंभीर आरोप करत तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी ड्रग लॉबी आणि काही मेडिकल कंपन्यांनी तब्बल २५० कोटी रुपये जमा केल्याचा दावा केला. तसेच पुढील आठवड्यात यासंदर्भातील नावे आणि पुरावे सार्वजनिक करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (IAS Tukaram Mundhe)
Tukaram Mundhe : ‘ही तर केवळ सुरुवात’; FDA चे आयुक्त तुकाराम मुंढेंची पोस्ट चर्चेत






