Satara : जावळीच्या प्रश्नांकरीता तहहयात लढेन – आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

Updated On:
Satara : जावळीच्या प्रश्नांकरीता तहहयात लढेन – आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

पाचगणी (प्रतिनिधी)- जावळीच्या प्रश्नांकरीता तहहयात लढत राहीन, जावळी हीच माउली आहे. जावळी हीच माझ्याकरीता प्रेमाची सदैव सावली आहे, असे मत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कुडाळ येते व्यक्त केले.

सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिंवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अभिष्टचिंतन सोहळा कुडाळ (ता. जावळी) येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्रात आपल्या लावणी लोकनृत्याने तरुणाईला बेभान होऊन नाचायला लावणारी गौतमी पाटील यांच्या बहारदार लावण्यांचा कार्यक्रम झाला. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो कार्यकर्त्याची लक्षवेधी उपस्थिती होती.

सामाजिक व राजकीय कारकिर्दीमध्ये जावळीकरांचा सिंहाचा वाटा आहे. आज जनतेच्या आशिर्वादामुळे मी राजकीय प्रवास करु शकलो हे अधोरेखीत सत्य आहे, असे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले. सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करताना दुर्गम जावळी तालुका हीच माझी माउली आहे अन्‌ जावळी तालुक्‍याची प्रेमाची सावली सदैव आहे. माझे सहकारी ही माझी ताकद आहे. सर्वसामान्य जनता अन्‌ सहकाऱ्यांची प्रामाणिक साथ ही माझी राजकीय ताकद असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी स्पष्ट केले.

Satara : खंडाळा येथील ग्रामीण रुग्णालय डॉक्टरविना सलाईनवर…

वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात त्यांच्या वाहनाच्या प्रतिमेचा हुबेहुब केक कापण्यात आला. कुडाळ येथील अभिष्टचितंन सोहळ्यात खास आकर्षण गौतमी पाटील यांच्या “सबसे कातील गौतमी पाटील’ या घोषवाक्‍याने परिसर दुमदुमुन गेला होता.

बेधुंद तरुणाईला थोपवण्यात पोलीसांची दमछाक होतानाचे चित्र होते. आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा अभिष्टचितंन सोहळा उठावदार करण्याकरीता प्रिश्रम घेतलेल्या युवा नेते समिर आतार व जयदीप शिंदे यांच्या पाठीवर आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची कौतुकाची थाप नवीन उर्जा देणारी ठरली.

आणखी संबंधित बातम्या

Satara: स्वीकृत नगरसेवक शंकर माळवदे यांचा राजीनामा

2026-10-08 07:42:29

Satara: स्वीकृत नगरसेवक शंकर माळवदे यांचा राजीनामा

Satara News : धक्कादायक ! जुन्या वैमनस्यातून शेंद्रेमध्ये युवकाचा निर्घृण खून

2026-10-03 21:39:17

Satara News : धक्कादायक ! जुन्या वैमनस्यातून शेंद्रेमध्ये युवकाचा निर्घृण खून

Satara News: सातारा तालुका पोलिसांचा दोषसिद्धीचा दमदार ठसा; जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी

2026-10-03 14:53:47

Satara News: सातारा तालुका पोलिसांचा दोषसिद्धीचा दमदार ठसा; जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी

Satara News : सातारा पोलिसांची धडक कारवाई ! CEIR पोर्टलद्वारे १.५ कोटींचे ४४९ चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत; नागरिकांना केले परत

2026-10-01 22:19:44

Satara News : सातारा पोलिसांची धडक कारवाई ! CEIR पोर्टलद्वारे १.५ कोटींचे ४४९ चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत; नागरिकांना केले परत

Satara: उत्तम नियोजनामुळे अजिंक्यतारा सूतगिरणीची प्रगती; ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले

2026-09-30 08:07:55

Satara: उत्तम नियोजनामुळे अजिंक्यतारा सूतगिरणीची प्रगती; ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले