Satara: राजपथ व राधिका रस्ता काँक्रिटचा होणार, ना. शिवेंद्रसिंहराजेंचा धडाका; दोन्ही रस्त्यांसाठी १२४ कोटी ८६ लाख निधी मंजूर
Satara सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती (मार्केट यार्ड) ते कोटेश्वर मंदिरपर्यंतचा रस्ता (राधिका रस्ता) विकसित करण्यासाठी 70 कोटी 60 लाख रुपये आणि राजपथावरील शाहू चौक ते राजवाडा गोलबागेपर्यंत रस्ता विकसित करण्यासाठी 54 कोटी 26 लाक रुपये मंजूर करण्यात आले. भू विकास बँक ते जुना आरटीओ चौक रस्त्याच्या धर्तीवर या दोन्ही रस्त्यांचे काम होणार असल्याने हे दोन्ही रस्ते दीर्घकालीन मजबूत आणि टिकाऊ होणार आहेत.

Satara: शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करणारे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून शहरातील दोन प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यासाठी तब्बल 124 कोटी 86 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.
सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती (मार्केट यार्ड) ते कोटेश्वर मंदिरपर्यंतचा रस्ता (राधिका रस्ता) विकसित करण्यासाठी 70 कोटी 60 लाख रुपये आणि राजपथावरील शाहू चौक ते राजवाडा गोलबागेपर्यंत रस्ता विकसित करण्यासाठी 54 कोटी 26 लाक रुपये मंजूर करण्यात आले. भू विकास बँक ते जुना आरटीओ चौक रस्त्याच्या धर्तीवर या दोन्ही रस्त्यांचे काम होणार असल्याने हे दोन्ही रस्ते दीर्घकालीन मजबूत आणि टिकाऊ होणार आहेत.
सातारा शहरातील आणि मेढा नगरपंचायत हद्दीतील विविध विकासकामांसाठी भरीव निधी उपलब्ध व्हावा यासाठी ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री शिंदे यांची त्यांच्या दरे येथील निवासस्थानी चर्चा केली होती. ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी सुचवलेल्या कामांना ना. शिंदे यांनी नगर विकास विभागाकडून भरीव निधी उपलब्ध करुन दिला आहे. शहरातील दोन रस्ते नव्याने खोदून दर्जेदार काँक्रिटीकरण करणे, सर्व्हिस डक्ट, नवीन पाणीपुरवठा पाइपलाइन, अंडरग्राऊंड विद्युत केबल्स, पथदिवे बसवणे आदी कामे करण्यासाठी हा निधी मंजूर झाला आहे.
मेढा स्मशानमभूमीसाठी २ कोटी ३० लाख मंजूर
जावळी तालुक्यातील मेढा नगरपंचायत हद्दीतील स्मशानभूमीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. या स्मशानभूमीच्या सर्वांगीण विकासासाठी ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून 2 कोटी 30 लाख रुपयांचा निधी नगरपरिषदांना वैशिष्टयपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेतून मंजूर झाला आहे. या निधीतून स्मशानभूमी परिसर विकसित करणे, सुशोभिकरण, पोहोच रस्ता, लोकांसाठी बसण्याची व्यवस्था, पाण्याची टाकी, तसेच अनुषंगिक कामे करण्यात येणार आहेत.
आठ दिवसात 209 कोटी 91 लाख
ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी विकासकामांचा धडाका लावला असून त्यांच्या माध्यमातून गेल्या आठ दिवसांत नगर विकास विभागाकडून तब्बल 209 कोटी 91 लाख रुपये निधी उपलब्ध करण्यात आला आहे. यामध्ये राधिका रोड व राजपथ रस्ता काँक्रिटीकरण व अन्य कामांसाठी तसेच मेढा स्मशानभूमी सुशोभिरण व अनुषंगिक कामे करण्यासाठी निधी मिळाला. तर शाहू कलामंदिर नव्याने बांधण्यासाठी 72 कोटी, शिवतीर्थ येथील छत्रपती शिवरायांचा 40 फुटी पुतळा उभारण्यासाठी 5.75 कोटी, भैरोबा टेकडी परिसर सुशोभिकरण करण्यासाठी 5 कोटी रुपयांच्या विकासकामांचा समावेश आहे.





