Satara: आबासाहेबांच्या दूरदृष्टीतून पाटणचा विकास, पालकमंत्री शंभूराज देसाई; शिवाजीराव देसाई यांना दौलतनगर येथे अभिवादन
Satara मंत्री देसाई म्हणाले, लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आबासाहेबांनी पाटण तालुक्यात सहकार चळवळीला बळ दिले. साखर कारखान्याची उभारणी हा तालुक्याच्या आर्थिक आणि सामाजिक इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ठरला. शेतकर्यांना आर्थिक स्थैर्य मिळावे, ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात आणि शिक्षणाचा विस्तार व्हावा, या उद्देशाने त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी आहे. कारखान्याच्या उभारणीसाठी अनेक कार्यकर्त्यांनी योगदान दिले. त्यांच्या त्यागातून उभ्या राहिलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होत आहे.

Satara: तालुक्याच्या विकासाची आज दिसणारी वाटचाल लोकनेते बाळासाहेब देसाई आणि शिवाजीराव (आबासाहेब) देसाई यांनी दूरदृष्टीने केलेल्या कार्याचा परिणाम आहे. सहकार, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रात त्यांनी घातलेला पाया अनेक कुटुंबांच्या प्रगतीचा आधार ठरत आहे. त्यांचे विचार आणि आदर्श जपणे, त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन, वाटचाल करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
दौलतनगर, ता. पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक-चेअरमन शिवाजीराव देसाई यांना 83 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. त्यावेळी पालकमंत्री देसाई बोलत होते. कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई, जयवंतराव शेलार, अशोकराव पाटील, संजय देशमुख, बाळासाहेब पाटील, अॅड. डी. पी. जाधव, उपसभापती विजय पवार, लोकप्रतिनिधी, शिवसेना आणि विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मंत्री देसाई म्हणाले, लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आबासाहेबांनी पाटण तालुक्यात सहकार चळवळीला बळ दिले. साखर कारखान्याची उभारणी हा तालुक्याच्या आर्थिक आणि सामाजिक इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ठरला. शेतकर्यांना आर्थिक स्थैर्य मिळावे, ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात आणि शिक्षणाचा विस्तार व्हावा, या उद्देशाने त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी आहे. कारखान्याच्या उभारणीसाठी अनेक कार्यकर्त्यांनी योगदान दिले. त्यांच्या त्यागातून उभ्या राहिलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होत आहे.
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समूहाच्या माध्यमातून एक हजार 800 विद्यार्थी शिक्षण घेत असून, 750 कुटुंबांना रोजगार मिळाला आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्याचे काम या समूहाकडून होत आहे. पाटण विधानसभा मतदारसंघात आज विकासाची नवी क्षितिजे खुली होत आहेत. मात्र, या विकासाची पायाभरणी कोणी केली, त्यासाठी संघर्ष कोणी केला आणि विकासाला दिशा कोणी दिली, याचे स्मरण प्रत्येकाने ठेवले पाहिजे. लोकनेते बाळासाहेब देसाई आणि आबासाहेबांनी घालून दिलेल्या आदर्शांवर मी आणि माझे सहकारी काम करत असून, भविष्यातही शेतकरीहित, सहकार, शिक्षण आणि रोजगाराला प्राधान्य दिले जाईल. संस्थापकांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कारखाना परिसरात उभारण्यात आलेले भव्य स्मारक, आबासाहेबांच्या नावाने साकारलेले स्मृतिभवन, मुलामुलींसाठी वसतिगृहे, आकर्षक उद्यान, लेझर शो, संगीत कारंजे आणि शिवाजीराव देसाई यांच्या पुतळ्याभोवती उभारलेली शिवसृष्टी यामुळे दौलतनगर परिसराला पर्यटनाच्या दृष्टीने नवी ओळख मिळत आहे. थोर व्यक्तींच्या स्मृती जतन करण्याबरोबरच त्यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम होत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आबासाहेबांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग नलवडे यांनी प्रास्ताविक केले.





