“मी डॉक्टरांना मूर्ख मानतो, एक-दोन जण मेल्यानं काय होतं?”; कबूतरखान्यांच्या मुद्द्यावरून कैवल्य रत्न महाराजांचे विधान

Dadar Kabutar Khana | मुंबईतील कबूतर खाने बंद करण्याच्या निर्णयावरून काही दिवसांपूर्वी गदारोळ झाला होता. यातच आता दादरच्या योगी सभागृहात कबूतर बचाओ धर्मसभा आयोजित करण्यात आले होते. या धर्मसभामध्ये जैनमूनी कैवल्य रत्न महाराज बरळल्याचे दिसून आले.
“कबूतर शांतता प्रिय प्राणी आहे. आमचा धर्म सांगतो, दुसऱ्यासाठी मरायचं असेल तरी चालेल. रावणासमोर जटायू पक्षी समोर आला होता. त्यामुळे पक्षी किती महत्त्वाचा आहे, हे तेव्हापासूनच लोकांना माहिती आहे. एका पक्षासाठी श्रीराम यांनी एवढं केलं. तर या रामाच्या भूमीमध्ये असं व्हायला नको आहे. मी डॉक्टरांना पण मूर्ख मानतो. एक-दोन जण मेल्यानं काय होतं?,” असे कैवल्य रत्न महाराज यांनी म्हंटले आहे.
‘देवेंद्र फडणवीस हे आपल्यामुळेच मुख्यमंत्री पदावर बसले’
“हजारो, लाखो निष्पाप लोक मरतायत, त्या बद्दल कोणी विचार करत नाहीय. पाण्यासासाठी तडफडतायत त्या बद्दल कोणाकडे विचार करायला वेळ नाही. एखादा माणूस झाडाचं पान अंगावर पडून मेला हे मान्य कराल का? हा मूर्खपणा आहे. कबुतराच्या विष्ठेमुळे जीव जाईल का? असं बोलत असतील, तर मी डॉक्टरांना सुद्धा मूर्ख मानतो” असं वक्तव्य कैवल्य रत्न महाराजांनी केलं. तर जैन मुनींनी राजकीय टिप्पणी करताना, देवेंद्र फडणवीस हे आपल्यामुळेच मुख्यमंत्री पदावर बसले आहेत. तसेच मंत्री मंगलप्रभात लोढा आज धर्मसभेत आले नाही, ही सरकारची मिलीभगत असल्याचे म्हंटले आहे.
‘कबूतर राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करा’
तर सुरेशजी महाराज म्हणाले, “कबूतर हा प्राणी आहे. त्याची हत्या झाली म्हणजे शंकराची हत्या झाल्यासारखं आहे. सर्व सनातनी धर्म तुमच्यासोबत आहे. कबूतर आणि गाय राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करा, ही माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे.” Dadar Kabutar Khana |
स्वरूपानंदजी महाराज म्हणाले, “आमच्या प्राण्यांवर जर हल्ला झाल्यास त्याला उत्तर देतो. मग त्यामध्ये त्यांना वाचवण्यासाठी शस्त्र उचलले तरी चालतील. जे सत्तेत बसलेत त्यांना साधूसंतांनी बसवले. आम्ही घरोघरी पोहोचलो आणि प्रचार केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहे. आम्ही साधूसंत रस्त्यावर उतरू,” असा इशाराही स्वरूपानंदजी महाराज यांनी दिला.
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेने कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे श्वसनाचे आजार होत असल्याचे कारण देत कबुतरखाने बंद करण्याची मोहीम सुरू केली आहे. या कारवाईला जैन समुदायाचा तीव्र विरोध आहे. या बंदमुळे मृत्यू झालेल्या हजारो कबुतरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून जैन समुदायाने दादर येथील योगी सभागृहात धर्मसभेचे आयोजन केले होते. Dadar Kabutar Khana |
हेही वाचा :





