Priyanka chopra: करवा चौथसाठी निक जोनसने दिल सरप्राइज; न्यूयॉर्कमध्ये प्रियंका चोप्राने साजरा केला सण

Priyanka chopra: बॉलिवूडची “देसी गर्ल” प्रियंका चोप्रा सध्या न्यूयॉर्कमध्ये असून, तिने तिथेच पारंपरिक पद्धतीने करवा चौथचा सण साजरा केला. या खास दिवशी तिचा पती, प्रसिद्ध गायक निक जोनस आपल्या टूरमधून वेळ काढून तिला सरप्राइज देत घरी आला. प्रियंकाने या खास क्षणांचे काही सुंदर फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
फोटोंमध्ये प्रियंका आणि निक एकत्र सेल्फी घेताना दिसत आहेत, तर काही छायाचित्रांमध्ये त्यांची मुलगी मालती मेरी चोप्रा जोनसही दिसते. प्रियंकाच्या हातावर मेहंदी रेखाटलेली आहे आणि ती पारंपरिक वेशात अतिशय सुंदर दिसत आहे. एका फोटोमध्ये मालती स्केच करतानाही दिसते.
प्रियंकाने पोस्टसोबत एक भावनिक संदेशही लिहिला आहे,
“सरप्राइज! निक करवा चौथसाठी घरी आला. दरवर्षी जेव्हा तो माझ्यासोबत हा सण साजरा करण्यासाठी घरी येतो, तेव्हा माझी सासू एक दिवस आधीच मला सरगी पाठवतात आणि माझी आई विकास खन्नाच्या हातचं स्वादिष्ट अन्न आणते. हेच माझ्या स्वप्नांचं जग आहे. माझ्या प्रिय चंद्रासाठी धन्यवाद निक, तू माझं आयुष्य आहेस. Love you forever!”
View this post on Instagram
या पोस्टनंतर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव करत प्रियंकावर प्रेमाचा वर्षाव केला. अनेकांनी लिहिलं, “तुमची जोडी खरंच स्वर्गात बनलेली आहे.”
प्रियंकाच्या कामाविषयी बोलायचं झालं तर ती सध्या दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्या पुढील चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा एक जंगल-अॅडव्हेंचर ड्रामा असणार आहे, ज्यात महेश बाबू आणि पृथ्वीराज सुकुमारन महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचा पहिला पोस्टर नोव्हेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे.
करवा चौथच्या या खास दिवशी प्रियंका आणि निकने पुन्हा एकदा सिद्ध केलं की अंतर कितीही असो, प्रेम नेहमी जवळ असतं.





