Wimbledon 2025 : विम्बल्डन विजेत्यांवर होणार पैशाचा पाऊस! IPL विजेत्यापेक्षा मिळणारा तब्बल इतक्या कोटींचे बक्षीस

Wimbledon 2025 Prize Money : वर्षातील तिसरा ग्रँड स्लॅम, विम्बल्डन, ३० जूनपासून सुरू होत आहे. नेहमीप्रमाणे, जगभरातील टेनिस चाहत्यांचे लक्ष या सर्वात प्रतिष्ठित चॅम्पियनशिपवर असेल. यंदा खेळाडूंसाठी विम्बल्डन अधिक आकर्षक ठरणार आहे, कारण यावेळी बक्षीस राशीत लक्षणीय वाढ झाली आहे. पुन्हा एकदा विम्बल्डन चॅम्पियनला आयपीएल २०२५ सारख्या जागतिक ख्यातीच्या क्रिकेट लीगच्या विजेत्यापेक्षा जास्त रक्कम मिळेल.
विम्बल्डन २०२५ च्या स्पर्धेतील बक्षीस रक्कम किती?
ऑल इंग्लंड लॉन टेनिस क्लब (AELTC) ने यंदा विम्बल्डनच्या एकूण बक्षीस रकमेत ७ टक्के वाढ केली आहे, तर पुरुष आणि महिला एकेरीच्या विजेत्यांना मागील वर्षीपेक्षा ११ टक्के अधिक रक्कम मिळेल.या ग्रँड स्लॅम स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम ६२३ कोटी रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. यापैकी पुरुष आणि महिला एकेरी गटातील विजेत्यांना प्रत्येकी सुमारे ३५ कोटी रुपये मिळतील.
आयपीएल 2025 च्या विजेत्या संघापेक्षा मिळणार जास्त रक्कम?
A reminder of the Order of Play for Day One at #Wimbledon
Tap the card below to view the full schedule 👇
— Wimbledon (@Wimbledon) June 30, 2025
विशेष बाब म्हणजे, आयपीएल २०२५ ची विजेती टीम आरसीबीला बक्षीस म्हणून २० कोटी रुपये मिळाले होते, तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ ची विजेती टीम दक्षिण आफ्रिकेला ३० कोटी रुपये देण्यात आले होते. विम्बल्डन २०२५ च्या एकेरी विजेत्यांना एकट्यालाच यापेक्षा जास्त बक्षीस रक्कम मिळेल. यंदा, पुरुष आणि महिला गटातील विजेत्यांना मागील वर्षीच्या पुरस्कार रकमेच्या तुलनेत ११.१% जास्त रक्कम मिळेल.
हेही वाचा – Rohit Sharma : ‘मनात खूप काही चाललं होतं अन् रात्रभर…’, रोहितने सांगितल्या टी-२० विश्वचषक विजयाच्या आठवणी
कोणाला किती मिळणार बक्षीस?
सिंगल्सच्या पहिल्या फेरीत पराभूत होणाऱ्या खेळाडूंना सुमारे ७६ लाख रुपये मिळतील, जे मागील वर्षीच्या तुलनेत १०% जास्त आहे. सिंगल्स पुरुष आणि महिला गटातील विजेत्यांना सुमारे ३५ कोटी रुपये, तर उपविजेत्यांना सुमारे १७.७१ कोटी रुपये मिळतील. त्याचबरोबर, उपांत्य फेरीतील खेळाडूंना सुमारे ९.०३ कोटी रुपये दिले जातील. याशिवाय, डबल्स आणि मिक्स्ड डबल्स गटातील अन्य विजेत्यांमध्ये एकूण पुरस्कार रक्कम वाटली जाईल.
हेही वाचा – Rishabh Pant : कार अपघातातून वाचलेला पंत पुन्हा धोक्यात? डॉक्टरांनी दिला इशारा
एईएलटीसीच्या अध्यक्षा काय म्हणाल्या?
एईएलटीसीच्या अध्यक्षा डेबोरा जेवांस म्हणाल्या, “आम्ही खेळाडूंचे म्हणणे ऐकले आहे आणि त्यांच्याशी चर्चा केली आहे. परंतु चार स्पर्धांवर, म्हणजेच ग्रँड स्लॅम्सच्या पुरस्कार रकमेवर लक्ष केंद्रित केल्याने टेनिससमोरील आव्हानांच्या मुळाशी पोहोचता येणार नाही. टेनिससमोरील खरी आव्हाने ही आहेत की खेळाडूंना हव्या त्या ऑफ-सीझनची संधी मिळत नाही आणि त्यांना सातत्याने दुखापतींचा सामना करावा लागत आहे, ज्याबद्दल ते बोलत आहेत. यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल.”





