SA vs ZIM : केशव महाराजचा ऐतिहासिक पराक्रम! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला दक्षिण आफ्रिकन फिरकीपटू

Keshav Maharaj 200 wickets complete in Test : दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत केशव महाराजने मोठा पराक्रम केला आहे. या दक्षिण आफ्रिकेच्या फिरकीपटूने एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. केशव महाराजने कसोटी क्रिकेटमध्ये २०० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. या कामगिरीसह तो कसोटी क्रिकेटमध्ये २०० विकेट्स घेणारा दक्षिण आफ्रिकेचा पहिला फिरकीपटू ठरला आहे.
पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळादरम्यान ३४व्या षटकात केशव महाराजने झिम्बाब्वेचा कर्णधार क्रेग एर्विनला बाद करत आपल्या २०० विकेट्सचा पल्ला गाठला. या विक्रमासह दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट इतिहासात एक नवीन अध्याय जोडला गेला आहे. केशव महाराजने केवळ आपल्या देशासाठीच इतिहास रचला नाही, तर तो कसोटी क्रिकेटमध्ये २०० विकेट्स घेणारा जगातील आठवा डावखुरा फिरकीपटू ठरला आहे.
जगातील आठवा डावखुरा फिरकीपटू –
HISTORY MADE! 🙌🔥
Keshav Maharaj claims his 200th Test wicket, the very first South African spinner to reach this milestone 🏏.
A monumental milestone for our world-class left-arm spinner, written into the history books with pride and passion! 🇿🇦💪
This one’s for the ages,… pic.twitter.com/RrIOLOrc8v
— Proteas Men (@ProteasMenCSA) June 29, 2025
यापूर्वी हा पराक्रम फक्त ७ गोलंदाजांनीच केला होता. महाराजने आपल्या कसोटी कारकिर्दीत सातत्याने प्रभावी कामगिरी केली आहे. त्याने अनेकदा कठीण परिस्थितीत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आता हा टप्पा गाठून त्याने आपल्या कारकिर्दीत आणखी एक मोठी उपलब्धी जोडली आहे. विशेष म्हणजे, त्याने ५९ कसोटी सामन्यांच्या ९९ डावांत २०० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे डावखुरे फिरकी गोलंदाज :
- रंगना हेराथ (श्रीलंका) – ४३३ विकेट्स
- डॅनियल व्हिटोरी (न्यूझीलंड) – ३६२ विकेट्स
- रवींद्र जडेजा (भारत) – ३२४ विकेट्स
- डेरेक अंडरवुड (इंग्लंड) – २९७ विकेट्स
- बिशन सिंग बेदी (भारत) – २६६ विकेट्स
- शाकिब अल हसन (बांगलादेश) – २४६ विकेट्स
- तैजुल इस्लाम (बांगलादेश) – २३७ विकेट्स
- केशव महाराज (दक्षिण आफ्रिका) – २०० विकेट्स





