Rishabh Pant : कार अपघातातून वाचलेला पंत पुन्हा धोक्यात? डॉक्टरांनी दिला इशारा

Rishabh Pant Warned Against Somersault Celebrations : भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने इंग्लंडविरुद्ध लीड्स कसोटी सामन्यात फलंदाजीत अप्रतिम कामगिरी केली. ऋषभने दोन्ही डावांमध्ये शतके (१३४ आणि ११८) ठोकली, ज्यामुळे तो एका कसोटी सामन्यात दोन शतके ठोकणारा जगातील दुसरा यष्टीरक्षक-फलंदाज ठरला. पंतव्यतिरिक्त झिम्बाब्वेचा माजी यष्टीरक्षक अँडी फ्लॉवर यानेच अशी कामगिरी केली होती. आता त्याला त्याच्या डॉक्टरांनी सॉमरसॉल्ट न करण्याचा इशारा दिला आहे.
ऋषभ पंतला डॉक्टरांनी दिला इशारा –
लीड्स कसोटी सामन्यात जेव्हा ऋषभ पंत यांनी पहिल्या डावात शतक ठोकले, तेव्हा त्यांनी ‘सॉमरसॉल्ट’ सेलिब्रेशन करून आनंद साजरा केला होता. मात्र, दुसऱ्या डावात शतक झळकावल्यानंतर त्यानी असे सेलिब्रेशन केले नाही. ऋषभ पंतने आयपीएल २०२५ मध्ये आरसीबीविरुद्ध शतक ठोकल्यानंतरही ‘सॉमरसॉल्ट’ करून आपला आनंद व्यक्त केला होता. आता ऋषभ पंतच्या अपघातानंतर त्याच्यावर उपचार करणारे सर्जन डॉ. दिनशॉ पारदीवाला यांनी त्याला इशारा दिला आहे.
पंतला का दिला इशारा?
Indian cricketer Rishabh Pant performs Somersault on ground to celebrate his century against England in the ongoing Leeds Test match. Pics: PTI#RishabhPant #Somersault #INDvsENG #TestCricket pic.twitter.com/JxewrZ7a6C
— Deccan Chronicle (@DeccanChronicle) June 21, 2025
पारदीवाला यांचे मत आहे की, पंतने अशा प्रकारे सेलिब्रेशन करणे आवश्यक नाही. पारदीवाला यांचे म्हणणे योग्य आहे, कारण अशा प्रकारच्या हालचालींमुळे गुडघ्यांवर आणि कंबरेवर खूप दबाव येतो. जर हे वारंवार केले गेले, तर आधीच कमकुवत असलेल्या सांध्यांना (जॉइंट्स) पुन्हा दुखापत होऊ शकते. एक चुकीचा कोन किंवा खराब लँडिंगमुळे सर्व काही बिघडू शकते.
हेही वाचा – Rohit Sharma : ‘मनात खूप काही चाललं होतं अन् रात्रभर…’, रोहितने सांगितल्या टी-२० विश्वचषक विजयाच्या आठवणी
कार अपघातात जखमी झाल्यानंतर ऋषभ पंत बराच काळ क्रिकेटपासून दूर राहिला होता. डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या कार अपघातात ऋषभ पंत जखमी झाला होता, तेव्हा डॉ. पारदीवाला यांनीच त्याच्या गुडघ्याच्या लिगामेंटची शस्त्रक्रिया केली होती. डॉ. पारदीवाला हे मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात ऑर्थोपेडिक सर्जन आहेत.
हेही वाचा – SA vs ZIM : केशव महाराजचा ऐतिहासिक पराक्रम! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला दक्षिण आफ्रिकन फिरकीपटू
डॉ. दिनशॉ पारदीवाला काय म्हणाले?
डॉ. दिनशॉ पारदीवाला यांनी द टेलीग्राफला सांगितले, “ऋषभने लहानपणी जिम्नॅस्टिक्स शिकले आहे, त्यामुळे तो चपळ आणि लवचिक आहे. ‘सॉमरसॉल्ट’ ही एक परिपूर्ण आणि चांगल्या प्रकारे सरावलेली हालचाल आहे, परंतु ती आवश्यक नाही. पंत खूप नशीबवान होता की तो त्या कार अपघातात जिवंत बचावला, कारण अशा प्रकारच्या अपघातात मृत्यूची शक्यता खूप जास्त असते. ऋषभ पंत खूप भाग्यवान आहे की तो जिवंत राहिला. अशा प्रकारच्या अपघातात, जिथे गाडी उलटते आणि आग लागते, तिथे मृत्यूचा धोका खूप जास्त असतो.”





