Union Budget 2026: सर्वात अधिक अर्थसंकल्पीय भाषणाचा विक्रम करणाऱ्या निर्मला सीतारमण यांनी यंदा किती वेळ केले भाषण?
Union Budget 2026: १ फेब्रुवारी २०२० रोजी अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी २ तास ४२ मिनिटे भाषण केले होते.

Union Budget 2026: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सलग नवव्यांदा लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या वेळी त्यांनी अनेक मोठ्या योजनांची घोषणा केली. यंदा त्यांनी १ तास २४ मिनिटांचे भाषण केले आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या नावावर सर्वात दीर्घ अर्थसंकल्पीय भाषणाचा विक्रम आहे. १ फेब्रुवारी २०२० रोजी अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी २ तास ४२ मिनिटे भाषण केले होते. यामुळे त्यांनी २०१९ मध्ये केलेल्या २ तास १५ मिनिटांच्या स्वतःच्याच विक्रमाला मागे टाकले होते.
निर्मला सीतारमण यांच्या आधी हा विक्रम माजी अर्थमंत्री जसवंत सिंग यांच्या नावावर होता. त्यांनी २००३ मध्ये २ तास १३ मिनिटांचे अर्थसंकल्पीय भाषण केले होते.
नवव्यांदा अर्थसंकल्प सादर
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सलग नवव्यांदा लोकसभेत अर्थसंकल्प मांडला. यंदा त्यांचे भाषण १ तास २४ मिनिटांचे होते. त्यांच्या आठव्या अर्थसंकल्पाच्या वेळी त्यांनी सुमारे १ तास १४ मिनिटे (७७ मिनिटे) भाषण केले होते.
अंतरिम अर्थसंकल्प सादर – ५७ मिनिटांचे भाषण
२०२४ मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्यामुळे १ फेब्रुवारी २०२४ रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. त्या वेळी अर्थमंत्र्यांचे भाषण सुमारे ५७ मिनिटांचे होते. Union Budget 2026:
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या आतापर्यंतच्या भाषणाची वेळ
वर्ष भाषणाची वेळ
2019 – 2 तास 15 मि.
2020 – 2 तास 42 मि.
2021 – 1 तास 40 मि.
2022 – 1 तास 23 मि.
2023 – 1 तास 27 मि.
2024 – 57 मि.
(अंतरिम बजेट)
2024 – 1 तास 25 मि.
(पूर्ण बजेट) – 1 तास 25 मि.
2025 – 1 तास 14 मि.
2026 – 1 तास 24 मि
निवडणुकांनंतर मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आले आणि त्यानंतर २३ जुलै २०२४ रोजी पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्या वेळी सीतारमण यांचे भाषण सुमारे १ तास २५ मिनिटांचे होते.
यापूर्वी, २०२३–२४ साठी त्यांनी १ तास २७ मिनिटांचे भाषण दिले होते. २०१९ मध्ये त्यांचे भाषण २ तास १४ मिनिटांचे होते.
२०२२ मध्ये त्यांनी १ तास ३२ मिनिटे भाषण केले. २०२१ साली निर्मला सीतारमण यांनी कागद न वापरता अर्थसंकल्प सादर केला होता आणि ते भाषण १ तास ४० मिनिटांचे होते. Union Budget 2026:
हेही वाचा :
Union Budget 2026: 7 हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर ते नवा आयकर कायदा; अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा…





