Bhumi Pednekar | बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया किंवा औषधांसारख्या शॉर्टकट्सचा वापर करतात. याबाबत आता अभिनेत्री भूमि पेडणेकरने आपल्या फिटनेसचा खरा अर्थ उघड केला आहे. तसेच औषधांच्या मदतीने वजन कमी करण्याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. भूमी पेडणेकरने नुकतीच सोहा अली खानच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने तिच्या फिटनेस जर्नीबाबत सांगितले. ती म्हणाली की, “४० किलोहून अधिक वजन कमी करण्याचा माझा प्रवास किती आव्हानात्मक होता. हा एका रात्रीत घडलेलं चमत्कार नव्हतं, तर १० वर्षांची सातत्यपूर्ण मेहनत होती. मला जीममध्ये व्यायाम करणे आवडायचे नाही. अक्षय सरांनी (अक्षय कुमार) स्ट्रेंथ ट्रेनिंगची ओळख करून दिली.” पुढे भूमी म्हणाली की, “माझ्या आयुष्यात असाही काळ आला जेव्हा मी खूप व्यायाम करायचे. त्याला कोणतेही बंधन नव्हते. त्यादरम्यान मी आजारी पडले होते. त्यानंतर मी माझ्या जीवनशैलीत खूप बदल केला. मी गेल्या दहा वर्षात माझी जीवनशैली बदलली आहे. आता मी खाणे आणि व्यायाम याकडे व्यवस्थित लक्ष देते. योग्य प्रमाणात या गोष्टी करते. हे खूप महत्वाचे आहे. आता मी फक्त ४०-४५ मिनिटे व्यायाम करते. आधी मी २ ते ३ तास व्यायाम करायचे. कोव्हिडच्या काळात तर वेड्यासारखा व्यायाम करायचे. मी डाएटबाबत कोणत्याही कठोर नियमांऐवजी संतुलनावर भर दिला.” Bhumi Pednekar | वजन कमी करण्यासाठी दहा वर्षे मेहनत घेतली भूमी असेही म्हणाली की, “एका पात्रासाठी मी खूप वजन कमी केले होते. मी दवाखान्यात होते. कारण मला डेंग्यू झाला होता. त्यावेळी १२ किलो वजन कमी झाले होते. माझे अर्धे केस गळाले होते. त्या वेदना असह्य होत्या. त्यावेळी लोक मला विचारायचे की मी ओझेम्पिकसारखी औषधे घेऊन वजन कमी केले आहे. पण मी वजन कमी करण्यासाठी दहा वर्षे मेहनत घेतली आहे. योग्य प्रकारे खात आहे. योग्य प्रमाणात व्यायाम करते, परिणामी माझे वजन कमी झाले आहे. “मला असेही लोक माहित आहेत की जे औषधे घेऊन वजन कमी करत आहे. पण, त्यांना त्याची गरज आहे. मी कोणालाही जज करत नाही. प्रत्येकाची एक जगण्याची पद्धत असते. पण हे खरे आहे की मी कोणतेही औषधे घेतल्याशिवाय ४० किलो वजन कमी केले आहे. महत्त्वाचे म्हणजे मी मजबूत होऊ इच्छिते, कारण मला दीर्घायुष्य हवं आहे, मी माझं संपूर्ण आयुष्य तरुण आणि ऊर्जेने भरलेलं अनुभवू इच्छिते,” असे म्हणत भूमीने तिच्या वजन कमी करण्याबद्दल सांगितले. Bhumi Pednekar | हेही वाचा: Laikey Laika First Poster: महाफ्लॉप डेब्यूनंतर राशा थडानी पुन्हा सज्ज; ‘लाइकी-लाइका’ चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित